मोठय़ा स्टारसोबत नव्या अभिनेत्रींचे लाँचिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 14:39 IST
अजय देवगनचा नवीन चित्रपट शिवायची सध्या जोरादार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबाबत दोन बातम्या येत आहे.पहिली म्हणजे या ...
मोठय़ा स्टारसोबत नव्या अभिनेत्रींचे लाँचिंग
अजय देवगनचा नवीन चित्रपट शिवायची सध्या जोरादार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबाबत दोन बातम्या येत आहे.पहिली म्हणजे या चित्रपटापासून अजय अनेक वर्षानंतर दिग्दर्शनाच्या मैदानात उतरत आहे. दुसरी बातमी अजयच्या अभिनेत्रीबाबत आहे. नात्याने सायरा बानोची नात असलेली सायशा सैगलला या चित्रपटात लाँच केले जाणार असल्याचे वृत्त आहे.मोठय़ा काळानंतर अजयसोबत नवीन अभिनेत्रीला लाँच केले जात आहे. यापूर्वी सिंघममध्ये त्यांच्यासोबतकाजल अग्रवाल प्रेक्षकांसमोर आली होती.दिग्गज स्टारसोबत नवख्या नायिकांचे येणे अलीकडे वाढले आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारा शाहरुख खानचा चित्रपट रईसमध्ये त्याची अभिनेत्री म्हणून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिंदी चित्रपटात पाय ठेवणार आहे तर आमीर खानच्या आगामी दंगल चित्रपटात साक्षी तंवर त्याच्या पत्नीची भूमिका करीत आहे, तर तिच्या व्यतिरिक्त चित्रपटात नवीन अभिनेत्री फातिमा सनाची लाँचिंग होणार आहे.आशुतोष गोवारिकरच्या येणार्या मोहनजोदडो चित्रपटात हृतिक रोशनसोबत पूजा हेगडेच्या करिअरची सुरुवात होणार आहे. यशराजच्या सुलतानबाबत मात्र गूढ कायम आहे.सुलतानची अभिनेत्री कोण असेल हे कळायला मार्ग असेल. अनुष्का शर्मापासून ते परिणीती चोपडापर्यंत अनेक नाव चर्चेत आहेत मात्र यशराजच्या सूत्रांनुसार सुलतानमध्यें सलमानसोबत नवीन चेहरा असेल असे संकेत मिळत आहेत. Photo Sources : HD Wallpapers and iHD Wallpapers