Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘शुभमंगल सावधान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST

नुकताच मुंबईत आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिकेतील ‘शुभमंगल सावधान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण चित्रपटाची टीम, आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर हे देखील उपस्थित होते.

नुकताच मुंबईत आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिकेतील ‘शुभमंगल सावधान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण चित्रपटाची टीम, आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर हे देखील उपस्थित होते. आयुषमान-भूमी यांनी अशा रोमँटिक अंदाजात फोटोग्राफर्सना पोझ दिली.आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांनी एकत्र याअगोदरही काम केले आहे. तेव्हाही या दोघांची जोडी प्रेक्षकांनी खूप पसंत केली. आता या चित्रपटाच्या निमित्ताने ते दोघे पुन्हा एकत्र आले आहेत.‘दम लगा के हैशा’ नंतर भूमी पेडणेकर हिने तिचे वजन बरेच कमी केले. आता तिचा या चित्रपटातील लूक खूपच स्टनिंग दिसतो आहे.आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर हे दोघे एकमेकांसोबत परफेक्ट कपल दिसते. ते एकमेकांसोबत खूपच क्यूट दिसत आहेत. या चित्रपटातील जोडीही प्रेक्षकांना नक्की आवडणार, असे दिसतेय.आयुषमान खुराना या चित्रपटात फारच साध्या वेशात आणि साध्या विचारसरणीच्या युवकाची भूमिका साकारत आहे. त्याचा हा अंदाज तरूणींना नक्कीच घायाळ करणार, यात काही शंका नाही.चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळयाप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर.या सोहळयाप्रसंगी एका चाहत्याने आयुषमानला त्याच्या आवाजातील एक गाणे गाण्याची फर्माईश केली. त्यावेळी त्याचा हा अंदाज पाहण्यासारखा होता.‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आयुषमान-भूमी यांनी जशी पोझ दिली आहे त्याचप्रमाणे चाहत्यांच्या फर्माईशनुसार या स्टेजवरही त्यांना तशीच पोझ द्यायला लावली. पाहा किती क्यूट दिसतोय या दोघांचा अंदाज....‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटाच्या टीमने फोटोग्राफर्सना अशी पोझ देत ट्रेलर लाँच केल्याची घोषणा केली.