Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ओके जानू’ चित्रपटातील ‘कारा फंकारा’ गाणे लाँच; पाहा, आदित्य रॉय कपूर-श्रद्धा कपूरची रोमँटिक केमिस्ट्री..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 16:34 IST

दाक्षिणात्य ब्लॉकबस्टर ‘ओके कन्मनी’ चित्रपटातही ‘कारा अट्टाकारा’ हे गाणे चित्रीत करण्यात आले होते. प्रेक्षकांना ते प्रचंड आवडले. आता अशाचप्रकारच्या या गाण्याला संगीतकार ए.आर.रहमान यांनी त्यांच्या हिंदी चाहत्यांसाठीही संगीतबद्ध केले आहे.

‘हम्मा हम्मा’,‘ एन्ना सोना’,‘तू दुआ है दुवा’,‘ओके जानू शीर्षक गीत’ या धमाकेदार रोमँटिक साँगनंतर आता ‘ओके जानू’ चित्रपटातील एकदम रॉकिंग ‘कारा फंकारा’ हे गाणे नुकतेच लाँच करण्यात आले आहे. मुख्य अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री ही चाहत्यांसाठी खऱ्या अर्थाने ट्रीट ठरणार  आहे. दाक्षिणात्य ब्लॉकबस्टर ‘ओके  कन्मनी’ चित्रपटातही ‘कारा अट्टाकारा’ हे गाणे चित्रीत करण्यात आले होते. प्रेक्षकांना ते प्रचंड आवडले. आता अशाचप्रकारच्या या गाण्याला संगीतकार ए.आर.रहमान यांनी त्यांच्या हिंदी चाहत्यांसाठीही संगीतबद्ध केले आहे.                                २०१५ मध्ये दलक्वेअर सलमान आणि नित्या मेनन यांच्या मुख्य भूमिकेत ‘ओके कन्मनी’ हा तमीळ चित्रपट रिलीज झाला होता. त्याचा हिंदी रिमेक म्हणून ‘ओके जानू’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे. दोन्ही चित्रपटांसाठी ए.आर.रहमान यांनीच संगीत दिले आहे. ‘कारा फंकारा’ या गाण्यात आदित्य-श्रद्धा यांची प्रेमकहानी चित्रीत केली आहे. एकमेकांसोबत फ्लर्टिंग करण्यापासून ते एक समंजस प्रेमापर्यंत पोहोचवणारा प्रवास यात चित्रीत करण्यात आला आहे. दोघांमध्ये अनेक किसींग सीन्स यात दाखवण्यात आले आहेत. गाण्यात आदित्यची व्यक्तीरेखा व्हिडीओ गेम्स खेळताना दिसतो. गाण्यात एक कार्टुन कॅरेक्टर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत उड्या मारताना दिसतो. तसेच या गाण्यात श्रद्धा आदित्यच्या ओठांवर हात ठेवून किस करताना दिसते आहे. ही ‘किस मोमेंट’ तमीळ चाहत्यांमध्ये खुप प्रसिद्ध आहे.                                                                     शाद अली दिग्दर्शित ‘ओके जानू’ हा चित्रपट १३ जानेवारीला रिलीज होणार आहे. आत्तापर्यंत चित्रपटातील गाणी, पोस्टर्स, ट्रेलर्स आऊट करण्यात आले आहेत. हा चित्रपट आता दीपिका पादुकोनच्या ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झैंडर केज’ चित्रपटासोबत बॉक्स आॅफीसवर तगडा मुकाबला करणार असे दिसतेय.