Join us

Latest Update : ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 21:44 IST

किडनीच्या त्रासामुळे गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल असलेले ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालयाकडून ...

किडनीच्या त्रासामुळे गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल असलेले ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लीलावती रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांनीच याबाबतचा खुलासा केला आहे. रुग्णालयाचे उपाध्यक्ष अजयकुमार पांडे यांनी आयएएनएसशी बोलताना म्हटले की, ‘त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना आता ताप नाही. श्वास घेण्यासही काही त्रास होत नाही. ते पूर्णपणे शुद्धीवर आहेत. त्यांनी डॉक्टरांनी सांगितल्यानुसार जेवणही केले आहे. त्यांच्या रक्तातील क्रिटीनिन स्तर कमी असून, त्यांना व्यवस्थितरीत्या लघुशंका होत आहे. जे आमच्यासाठी चांगले संकेत आहेत. ९४ वर्षीय दिलीपकुमार यांच्यावर हृदयरोगतज्ज्ञ नितीन गोखले आणि किडनीरोगतज्ज्ञ अरुण शाह उपचार करीत आहेत. दिलीपकुमार यांना डिहायड्रेशन आणि लघुशंकेच्या नलिकेत संक्रमण झाल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. मात्र शनिवारी सायंकाळी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांच्या चाहत्यांच्या प्रार्थनांना यश येत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या अधिकाºयांनी दिलीपकुमार यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितल्याने दिलीपकुमार यांच्या कुटुंबामध्येही उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांपासून दिलीपकुमार यांची प्रकृती खालावत आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात त्यांना प्रचंड ताप आल्याने लीलावती रुग्णालयातच दाखल केले होते. त्यावेळी त्यांनीच ट्विट करून प्रकृती अस्वस्थ असल्याचे त्यांच्या चाहत्यांना सांगितले होते. यावेळी त्यांनी रुग्णालयातील एक फोटो शेअर करीत चाहत्यांना हेल्थ अपडेटही दिली होती. ९४ वर्षीय दिलीपकुमार अखेरीस १९९८ मध्ये आलेल्या ‘किल्ला’ या चित्रपटात बघावयास मिळाले होते. त्यांना १९९४ मध्ये दादासाहेब फाळके अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. ‘देवदास’, ‘मुगले आझम’ आणि ‘कर्मा’ यांसारख्या चित्रपटांमधील भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात आहेत. त्यांनी त्यांच्या वयापेक्षा २० वर्ष लहान असलेल्या सायरा बानू यांच्याबरोबर विवाह केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला.