Join us
Daily Top 2Weekly Top 5

Latest PIC : करिना कपूरने शेअर केला तैमूरचा क्यूट फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 17:06 IST

अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर याची एक झलक बघण्यासाठी करिना आणि सैफचे फॅन्स ...

अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर याची एक झलक बघण्यासाठी करिना आणि सैफचे फॅन्स अक्षरश: आतुर झाले आहेत. सोशल मीडियावर तर यावरून रोजच खलबत्ते सुरू असतात. काही दिवसांपूर्वी सैफने बेबी तैमूरचा एक फोटो शेअर केला होता, त्यात तैमूर खूपच क्यूट दिसत होता. अगदी दोन दिवसांपूर्वीच करिना कपूरला तैमूरसोबत स्पॉट केले होते. तैमूर एका शुभ्र कपड्यात केअरटेकरच्या खांद्यावर मान ठेवून होता; मात्र त्याच्या एवढ्याशा झलकने नेटिझन्सचे मन भरले नसेल यात शंका नाही. त्यामुळेच की काय आता तैमूरचा आणखी एक फोटो समोर आला असून, आई करिनासोबत असलेला तैमूर खूपच गोंडस दिसत आहे. त्याचबरोबर तो आईचा किती लाडका आहे हेही फोटोवरून स्पष्ट होत आहे. तीन महिन्यांच्या झालेल्या तैमूरविषयी गेल्या काही दिवसांपासून एक बातमी सातत्याने समोर येत आहे. ती म्हणजे करिना तैमूरला ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमाच्या सेटवर सोबत घेऊन जाणार आहे. त्याचबरोबर यावेळी तैमूरचे काही गोंडस फोटो समोर येतील अशी अपेक्षाही फॅन्सकडून व्यक्त केली जात होती; मात्र मध्येच करिनासोबतचा तैमूरचा एक क्यूट फोटो समोर आल्याने फॅन्सची आतुरता काहीशी कमी झाली आहे. करिनाने नुकत्याच झालेल्या जी सिने अवॉर्ड्समध्ये परफॉर्मन्स केला होता. या परफॉर्मन्ससाठी तिने कॅटरिना कैफला रिप्लेस केले होते. तिने या धमाकेदार परफॉर्मन्समध्ये शाहरूख खान, सलमान खान, आमीर खान आणि पती सैफ अली खान यांना सन्मान दिला होता. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमाची शूटिंग मे महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. हा सिनेमा महिला केंद्रित असून, आतापर्यंत अशाप्र्रकारचा सिनेमा बनविण्यास कोणीही धाडस केले नसल्याचा दावाही यावेळी स्वरा हिने केला होता. काही दिवसांपूर्वी करिनाने या सिनेमाच्या कथेवरून खुलासा केला होता. करिना म्हणाली होती की, माझ्या मते भारतातील हा पहिला मुलांचा रिअल सिनेमा असेल. सिनेमात चार मुली आणि त्यांचे चार मित्र असतील. त्यात माझी भूमिका वास्तव आणि मजेदार असेल असेही करिनाने म्हटले होते.त्याचबरोबर सिनेमाच्या सेटवर तैमूरलाही सोबत घेऊन जाणार असल्याचे तिने स्पष्ट केले होते. त्यामुळे आता तैमूरचे आणखी काही गोंडस फोटो बघायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.