Join us
Daily Top 2Weekly Top 5

पद्मावतीमध्ये लता मंगेशकरचा आवाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 20:59 IST

संजय लिला भंसाळीचा ‘पद्मावती’ हा चित्रपट सतत चर्चेत आहे. त्यामधील स्टारकास्टमुळेही मोठी उत्सुकता लागून आहे. यामध्ये आता संगीत कु ...

संजय लिला भंसाळीचा ‘पद्मावती’ हा चित्रपट सतत चर्चेत आहे. त्यामधील स्टारकास्टमुळेही मोठी उत्सुकता लागून आहे. यामध्ये आता संगीत कु णाचे राहणार यावरुन वेगवेगळे वृत्त येत आहेत. भंसाळी यांच्या चित्रपटाच्या सेटअप जसे असते.त्याचप्रमाणे संगीतही हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. पद्मावतीसाठीही ते आठवणीत राहील अशा संगीतासाठी प्रयत्न करीत आहे. त्याकरिताच ते लता मंगेशकरने या चित्रपटात गाणी सादर करावीत, याकरिता प्रयत्न करीत आहेत.  यासाठी ते अनेकदा मंगेशकर यांना भेटले आहेत. परंतु, यासंदर्भात अजूनही होकार आलेला नाही. भन्साळीने ज्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, त्यामध्ये कविता कृष्णमूर्ति, अलका याज्ञिक व श्रेया घोषालने आवाज दिलेला आहे. लता मंगेशकरचा आवाज त्यांच्या चित्रपटात अजून ऐकायला मिळालेली नाही. पद्मावती मध्ये मुख्य भूमिकेसाठी दीपिका पादुकोण तर रणवीर सिंह सुद्धा अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेसाठी फाईनल झाले आहेत. आता केवळ पद्मावतीच्या पतीची भूमिका बाकी असून, यामध्ये शाहिद कपूरचे नाव हे सर्वात आघाडीवर आहे.