Join us  

... सलमान आजही मला रात्री-अपरात्री फोन करतो; लारा दत्ताने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 6:29 PM

Lara dutta: एका मुलाखतीमध्ये लाराने सलमानविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) जितका त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत येत असतो. तितकाच पर्सनल लाइफमुळेही प्रकाशझोतात येत असतो. यात अनेकदा त्याची प्रेमप्रकरणं, लग्न या गोष्टींची चर्चा होते. विशेष म्हणजे या चर्चांमध्येच अभिनेत्री लारा दत्ताने (lara dutta) सलमानविषयी एक मोठा खुलासा केला आहे. सलमान अनेकदा मला रात्री-अपरात्री फोन करतो असं ती एका मुलाखतीत म्हणाली आहे. तिच्या या खुलाशानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. 

लारा दत्ता आणि सलमान खान यांच्यातील मैत्री साऱ्यांनाच ठावूक आहे. पार्टनर या चित्रपटात दोघांनीही एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातही त्यांची मैत्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली होती. विशेष म्हणजे अलिकडेच एका मुलाखतीत लाराने त्यांच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे.

"सलमान रोज रात्री १२ नंतर उठतो आणि त्यावेळी कधीही मध्यरात्री मला फोन करतो. मध्यरात्री फोन करणं ही त्याची ठरलेली वेळ आहे. त्यामुळे तो फोन करतो आणि मीदेखील एवढ्या उशीरा त्याचे फोन उचलते", असं लारा म्हणाली.

दरम्यान, लारा आणि सलमान यांच्यातील मैत्री साऱ्यांनाच ठावूक आहे. या दोघांना 'पार्टनर', 'नो एन्ट्री' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लाराने काही दिवसांपूर्वीच 'हिकप्स अॅण्ड हूकप्स' सीरिजच्या माध्यमातून डिजिटल विश्वात पदार्पण केलं आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत प्रतिक बब्बर आणि शिनोवा यांनी स्क्रीन शेअर केली आहे. 

टॅग्स :लारा दत्तासलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटी