Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर बदलली रकुल प्रीत सिंग, प्रत्येक गोष्ट नवरा जॅकीला विचारुन करते, बेस्ट फ्रेंडनं केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 13:33 IST

लग्नानंतर रकुल प्रीत सिंग बदलली असल्याचं तिच्या बेस्ट फ्रेंड सांगितलं.

Lakshmi Manchus On Rakul Preet Singh : बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी साऊथ इंडस्ट्रीत नाव कमावलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि दाक्षिणात्य सुपरस्टार मोहन बाबूंची मुलगी लक्ष्मी मंचू यांच्या मैत्रीचे किस्से खूप प्रसिद्ध आहेत. हैदराबादमध्ये राहणाऱ्या या दोघींची मैत्री इतकी घट्ट होती की, रकुलचे लग्न होईपर्यंत लक्ष्मी जेव्हा-केव्हा मुंबईत यायची, तेव्हा ती रकुलसोबतच राहायची. पण, जेव्हा रकुलने निर्माता-अभिनेता जॅकी भगनानीशी लग्न केलं, तेव्हा त्यांच्या मैत्रीत एक 'ट्विस्ट' आल्याचं  खुद्द लक्ष्मी मंचूने सांगितलं आहे.

नुकतंच हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मी मंचूने रकुलसोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं. लग्नानंतर रकुल बदलली असल्याचा खुलासा लक्ष्मीने केला. लक्ष्मी म्हणाली,"एके दिवशी रकुल माझ्यावर खूप नाराज झाली होती. माझ्या वाढदिवसाच्या पार्टीत जॅकी आणि रकुल दोघांनीही मला बाजूला बोलावले आणि माझ्याकडे पाहून ते म्हणाले, 'लक्कू (लक्ष्मीचे टोपणनाव), तू खूप बदलली आहेस!' हे ऐकून मला धक्काच बसला! मी लगेच त्यांना विचारले, 'अरे, मी नक्की काय केलं आहे?'"

लक्ष्मीने पुढे स्पष्ट केले की, हा बदल नैसर्गिक आहे. आता दोघांचेही आयुष्य बदलले आहे. रकुलचे नुकतेच लग्न झाले आहे आणि त्यांचे मुंबईत स्वतःचे घर झाले आहे, त्यामुळे 'रोज भेटणं' आता शक्य होत नाही. रकुल आता प्रत्येक गोष्टीत तिचा नवरा जॅकी भगनानीचा सल्ला घेते, असं लक्ष्मीने सांगितलं.  लक्ष्मी मंचू हसून म्हणाली, "आता रकुलला काहीही विचारा, तिचं उत्तर ठरलेलं असतं. ती लगेच म्हणेल, 'मला जॅकीला विचारू दे' किंवा 'जॅकी उद्या कामावर आहे'. ती सतत फक्त 'जॅकी... जॅकी...' करत असते!".

लक्ष्मी पुढे म्हणाली, "तिचं नुकतंच लग्न झालं आहे, म्हणून मी तिला काही बोलले नाही. मी एक वर्ष गप्प आहे. पण, एक वर्ष पूर्ण झाल्यावर मी तिला नक्की फटकारणार! मी तिला स्पष्ट सांगेन, 'अगं, जर जॅकी येऊ शकला नाही, तर तू एकटी तरी येऊ शकतेस ना'".

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rakul Preet Changed Post-Wedding: Asks Jackky About Everything, Says Best Friend

Web Summary : Rakul Preet Singh's friend, Lakshmi Manchu, reveals Rakul changed after marrying Jackky Bhagnani. Rakul now consults Jackky on everything, leaving less time for friends. Lakshmi jokingly plans to scold her after a year.
टॅग्स :रकुल प्रीत सिंगजॅकी भगनानी