Join us  

अनन्याने 'या' दोन व्यक्तींमुळे केला 'लायगर', बॉक्स ऑफिसवर झाला फ्लॉप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 10:47 AM

अनन्याने साऊथचा स्टार विजय देवरकोंडासोबत 'लायगर' सिनेमात काम केलं होतं. जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. यावर अभिनेत्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

सध्या करण जोहरचा सर्वात लोकप्रिय टॉक शो कॉफी विथ करण सीझन ८ बॉलिवूड वर्तुळातील चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. लेटेस्ट एपिसोडमध्ये अनन्या पांडे आणि सारा अली खान यांनी हजेरी लावली होती. यादरम्यान दोघींनी अनेक खुलासे केले. अनन्याने तिच्या पर्सनल आणि प्रोफोशनल आयुष्यावर भाष्य केलं. अनन्याने साऊथचा स्टार विजय देवरकोंडासोबत 'लायगर' सिनेमात काम केलं होतं. जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. यावर अभिनेत्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

अनन्याने खुलासा केला की, तिच्या आईने तिला 'लायगर' चित्रपट साइन करण्यास सांगितले होते. अनन्याने सांगितले की, भावना पांडे तिची मते तिच्या खास शैलीत व्यक्त करते. इतकंच नाही तर 'लायगर' हा चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाला तेव्हा अनन्याने आईची प्रतिक्रिया काय होती याबद्दलही सांगितले.

अनन्याच्या म्हणण्यानुसार, तिची आई तिचे चित्रपट पाहिल्यानंतर तिला नेहमी कॉल करते आणि मेसेज करते. पण, विजय देवरकोंडा स्टारर 'लायगर' पाहिल्यानंतर तिला तिच्या आईकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. जेव्हा अनन्याने विचारले की तुम्हाला चित्रपट कसा वाटला? यावर त्याच्या आईने उत्तर दिले, 'फन!' अनन्याने सांगितले की, चित्रपटाला मिळालेला हा सर्वात वाईट रिव्ह्यू होता.

भावना पांडे आणि करण जोहर यांनीच तिला 'लाइगर' साइन करण्यास सांगितले होते, असा खुलासा अनन्या पांडेने केला. अनन्या म्हणाली,  ''चुका सगळ्यांकडून होतात..''  वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, अनन्याकडे झोया अख्तरचा 'खो गये हम कहाँ' दिसणार आहे, ज्यात अनन्या सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 

टॅग्स :अनन्या पांडेकरण जोहर