Join us

कुणाल खेमू आणि सोहा अली खानने आपल्या चिमुकलीचे केले नामकरण; तैमूरप्रमाणेच ठेवले हटके नाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 19:58 IST

अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू या दाम्पत्याने नुकत्याच जन्मलेल्या त्यांच्या चिमुकलीचे नामकरण केले आहे. महानवमीच्या दिवशी सोहा ...

अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू या दाम्पत्याने नुकत्याच जन्मलेल्या त्यांच्या चिमुकलीचे नामकरण केले आहे. महानवमीच्या दिवशी सोहा अली खान हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अशात नव्याने मम्मी-पप्पा बनलेल्या कुणाल आणि सोहाने त्यांच्या या लाडकीचे नामकरण केले आहे. काही वेळापूर्वीच कुणालने ट्विट करून त्याच्या मुलीचे नाव चाहत्यांबरोबर शेअर केले. कुणाल आणि सोहाने सर्वांच्या अनुमतीने मुलीचे नाव इनाया नाओमी खेमू असे ठेवले आहे. यावेळी कुणालने लिहिले की, इनाया खूप खुश आणि हेल्दी आहे. तुम्हा सर्वांनी आशीर्वाद आणि प्रेम दिल्याबद्दल ती तुम्हाला धन्यवाद म्हणत आहे. दोन दिवसांपूर्वीच कुणालन ट्विटरच्या माध्यमातून मुलगी झाल्याची बातमी दिली होती. यावेळी मी खूप आनंदी असल्याचेही कुणालने म्हटले होते. खरं तर पतौडी परिवारात एका पाठोपाठ एक आनंदाचे क्षण येत आहेत. कारण नऊ महिने अगोदरच सोहाचा भाऊ सैफ अली खान आणि करिना कपूर यांना मुलगा झाला होता. ज्याचे नाव तैमूर अली खान असे ठेवण्यात आले. दरम्यान, सोहा आई झाल्याचा सर्वाधिक आनंद तिची आई शर्मिला टागोर यांना झाला आहे. या चिमुकलीचा जेव्हा जन्म झाला, तेव्हापासून शर्मिला यांनी आपल्या नातीला एक क्षणीही एकटे सोडले नाही.  दरम्यान, २७ सप्टेंबर रोजीच बातमी आली होती की, सोहाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सोहा सातत्याने आपल्या गर्भारपणाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करीत होती. वहिनी करिना कपूरप्रमाणेच तिने तिच्या प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय केला. ती सातत्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करीत होती. असो, मम्मी सोहा आणि तिची चिमुकली यांची प्रकृती ठणठणीत असून, संपूर्ण पतौडी परिवारात सध्या दिवाळी साजरी केली जात आहे.