Join us

​कुणाल कपूरने दाखविले मसल्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 16:23 IST

अभिनेता कुणाल कपूरने नुकताच एक फोटो शेअर केला असून, त्यात तो आपले मसल्स दाखविताना दिसतो आहे.काही दिवसांपूर्वी कुणालने ...

अभिनेता कुणाल कपूरने नुकताच एक फोटो शेअर केला असून, त्यात तो आपले मसल्स दाखविताना दिसतो आहे.काही दिवसांपूर्वी कुणालने चंदू चेकवार याच्या वीरममध्ये कलरीपट्टूची भूमिका निभावली होती. आता त्याच्या शरीरात खूप बदल झाला आहे. त्याने पूर्वीचा आणि आताचा फोटो शेअर केला आहे. यात त्याच्या शरीरात झालेला बदल जाणवतो.सहा महिनंतर आता झालेल्या बदलाविषयी तो लिहितो, ‘२३ दिवस, १२ तास आणि २३२ प्रोटिन्स शेक्स’ यासंदर्भात त्याने ट्विट करून माहिती दिली. रंग दे बसंती या चित्रपटात त्याने भूमिका केली होती. त्याच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले. काहींनी तर त्याला खाल ड्रोगोचीही उपमा दिली. ज्यावेळी पुरूष रागाला जातो, त्यावेळी तो असा दिसतो असेही काहींनी म्हटले आहे.वीरम हा चित्रपट आपल्याला आव्हानात्मक होता. शूटिंगचे शेड्यूल सांभाळताना त्याने आपले शरीरही जपले. यासाठी त्याने २१-२२ तास इतका वेळ व्यायाम केला.