क्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 16:13 IST
अभिनेत्री क्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. इन्स्टावर नूपुरने एकापेक्षा एक फोटो अपलोड केले असून, त्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
क्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो!
अभिनेत्री क्रिती सॅननची बहीण नूपुर सॅननने अद्यापपर्यंत चित्रपटात येण्याबाबतची रितसर घोषणा केलेली नाही. परंतु अशातही तिच्या चाहत्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. इन्स्टाग्रामवरील लाखो फॉलोवर्स आणि बहीण क्रितीसोबतच्या फोटोंमुळे तिचे फॅन फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. नूपुरला जरी लोक तिची बहीण क्रितीमुळे ओळखत असले तरी, आपल्या स्टाइल सेंन्समुळेही ती चांगलीच प्रसिद्ध होताना दिसत आहे. तिची स्टाइल चिक असतानाही खूपच एथनिक आहे. तिच्या फोटोंवरून असे वाटते की, तिला इंडो वेस्टर्न स्टाइल खूप आवडत असावी. त्यामुळेच सध्या ती आपल्या फॅशन स्टाइलमुळे लोकांना आकर्षित करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच नूपुरला जुहू येथे बघण्यात आले होते. कुर्ता आणि जिन्स अशा साध्या लूकमध्येही ती खूपच सुंदर दिसत होती. वास्तविक या आउटफिटमध्ये यापूर्वीही आपण बºयाचशा सेलिबे्रटींना बघितले आहे. मात्र नूपुरने याठिकाणीदेखील काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. तिने गुडघ्यापेक्षा खाली कुर्ता घातला होता. त्यावर तिने जिन्स घातली होती. या आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. सध्या नूपुरने तिच्या इन्स्टावर बरेचसे फोटो शेअर केले असून, त्यातील तिचा अंदाज बघण्यासारखा आहे. इन्स्टावर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिने राणी कलरचा बनारसी ब्लाउस आणि त्यावर आॅफ व्हाइट लहेंगा स्कर्ट परिधान केला आहे. मात्र तिच्या फोटोचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे तिची नथ होय. नाकात असलेल्या या नथीमुळे तिच्या संपूर्ण स्टाइलवर परिणाम पडल्याचे दिसून येते. या पटियाला सलवार सूटमध्ये नूपुरने इंडियन समर लूकला संपूर्ण न्याय दिल्याचे दिसते. या ड्रेसवर तिने कॅरी केलेल्या ओढणीवरील सिक्वेनचे काम खरोखरच सुंदर आहे. या ड्रेसवरून तिच्या च्वॉइसचा अंदाज बांधणे शक्य होते. प्लेन पॅण्ट आणि प्रिंटेड शर्टचे कॉम्बिनेशन बेस्ट समजले जाते. परंतु नूपुरने एका फोटोमध्ये ओव्हरसाइज पलाजू पॅण्टवर प्रिंटेड ट्यूनिक परिधान करून या कॉम्बिनेशनला जबरदस्त ट्विस्ट दिला आहे. नूपुरने केलेली ही स्टाइल उन्हाळ्यात तर परफेक्ट आहेच, शिवाय गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला सर्वांमध्ये उठून दिसायचे असेल तर ही स्टाइल फायदेशीर ठरू शकते. आता नूपुरने परिधान केलेला या तरुण तहलियनीच्या एम्ब्रॉयडरी असलेला लहेंगा पाहा. हा आउटफिट तिने गेल्या फेब्रुवारी महिन्यात परिधान केला होता. यामध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसतो. दरम्यान, नूपुरचा हा स्टाइल सेन्स बघून कोणीही सांगू शकेल की, ही तिची बॉलिवूड तयारी असावी. कारण या स्टाइलमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळत असून, ते तिच्या बॉलिवूड करिअरसाठी फायदेशीर ठरू शकते.