दरम्यान, आॅडी इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर क्रितीसोबतचा एक फोटो पोस्ट केला. फोटोमध्ये आॅडी इंडियाचे प्रमुख राहिल अंसारी दिसत आहेत. क्रितीच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल सांगायचे झाल्यास, तिने खूपच कमी कालावधीत इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत तिने बºयाचशा चित्रपटांमध्ये काम केले केले. परंतु यातील मोजकेच चित्रपट प्रेक्षकांवर प्रभाव टाकू शकले असले तरी, क्रितीच्या भूमिकेचे मात्र सर्वत्र कौतुक केले गेले.
क्रिती तिच्या लव्ह लाइफमुळेही चर्चेत आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्याबरोबर तिचे अफेअर असल्याची चर्चा आहे. बºयाचदा हे दोघे एकत्र बघावयास मिळाले आहेत. क्रितीने ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर तिने शाहरूख खान, वरुण धवन आणि काजोल यांच्याबरोबर ‘दिलवाले’ या चित्रपटात काम केले. पुढे २०१७ मध्ये ती ‘राब्ता’ आणि आयुष्यमान खुराणासोबत ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटात झळकली.