Join us  

गोविंदाच्या सूनबाईंनी पार केल्या मर्यादा; बेडरुममधील बिकिनी फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 3:36 PM

Kashmera shah: कश्मिराचा कलाविश्वातील वावर पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते.

प्रसिद्ध विनोदवीर आणि अभिनेता कृष्णा अभिषेकची (Krushna Abhishek) पत्नी अभिनेत्री कश्मीरा शाह (Kashmera Shah) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. कश्मिराचा कलाविश्वातील वावर पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते. यात अनेकदा ती तिचे बोल्ड फोटो किंवा व्हिडीओ शेअर करुन चर्चेत येते. यावेळीदेखील कश्मिराने असंच काहीसं केलं आहे. अलिकडेच तिने चक्क बेडरुममधील एक फोटो शेअर केला आहे. 

अलिकडेच कश्मिराने इन्स्टाग्रामवर तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत असून तिचा हा फोटो बेडरुममधील असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिचं कौतुक केलं आहे. तर, काहींनी मात्र, तिला ट्रोलदेखील केलंय.

दरम्यान, कश्मिराने वयाची ४० पार केली असून ती ४९ वर्षांची असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, या वयातही तिने तिचा फिटनेस जपला आहे. कश्मिरा तिच्या बोल्डनेससोबतच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील घरगुती वाद साऱ्यांनाच ठावूक आहे. याच वादामध्ये कश्मिराने अनेकदा गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता यांच्यावर टीकास्त्र डागले आहेत. 

टॅग्स :सेलिब्रिटीगोविंदाकृष्णा अभिषेकटिव्ही कलाकार