Join us  

KRK ने Ranveer Singh च्या लॉन्चबाबत केला धक्कादायक दावा, 'त्याच्या वडिलाने YRF ला २० कोटी रूपये...'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 3:36 PM

KRK : रणवीर सिंह (Ranveer Singh) बॉलिवूडमधील सर्वात चांगल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीर सिंह याला आदित्य चोप्राच्या (Aditya Chopra) यशराज प्रॉ़डक्शनकडून 'बॅंड बाजा बारात' च्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलं होतं.

बॉलिवूडचा वादग्रस्त फिल्म किटिक्स आणि अभिनेता केआरके (KRK) नेहमीच रिलीज झालेल्या सिनेमांचे वादग्रस्त रिव्ह्यू करण्यासाठी ओळखला जातो. इतकंच नाही तर तो अनेक बॉलिवूड स्टार्सबाबत आक्षेपार्ह वक्तव्यही करत असतो. सलमान खानने केआरकेवर मानहानीचा दावा ठोकला आहे. हे संपत नाही तर केआरकेने आता एक नवा धक्कादायक दावा केला आहे. नुकताच यशराज प्रॉडक्शनच्या (YRF) माध्यमातून रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) बॉलिवूड एन्ट्रीबाबत बोलला.

रणवीर सिंह बॉलिवूडमधील सर्वात चांगल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीर सिंह याला आदित्य चोप्राच्या यशराज प्रॉ़डक्शनकडून 'बॅंड बाजा बारात' च्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलं होतं. यात त्याने अनुष्का शर्मासोबत काम केलं होतं आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमानंतर रणवीर सिंहने बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख मिळाली होती. Bollywoodlife.com या वेबसाइटच्या एका वृत्तानुसार, केआरकेने दावा केला आहे की, रणवीर सिंह याला आदित्य चोप्राने लॉन्च केलं नव्हतं. यशराज फिल्म्स रणवीर सिंहचं बॉलिवूडमद्ये एन्ट्रीचं केवळ एक माध्यम होतं.  हा केआरकेने 'बंटी और बबली २' सिनेमाच्या रिव्ह्यूवेळी केला.

केआरकेने दावा केला की, रणवीरच्या वडिलांनी आपल्या मुलाला इंडस्ट्रीमध्ये लॉन्च करण्यासाठी यशराज फिल्स्मला २० कोटी रूपये दिले होते. केआरके म्हणाला की, 'आता तुम्ही विचार करत असाल की, रणवीर सिंह यालाही यशराज फिल्म्सने लॉन्च केलं होतं आणि आज तो एक मोठा स्टार आहे. एक बाब जाणून घ्या की, आदित्यने रणवीरला लॉन्च केलं नव्हतं तर आदित्यच्या माध्यमातून रणवीरला लॉन्च करवून घेण्यात आलं होतं'. केआरके म्हणाला की, 'रणवीरच्या वडिलांनी आदित्यला २० कोटी रूपये दिले आणि त्यानंतर यशराज फिल्स्मने त्याला लॉन्च केलं'. 

टॅग्स :कमाल आर खानरणवीर सिंगबॉलिवूडआदित्य चोप्रा