क्रिती सॅनन व सुशांत सिंह राजपूतने आवळला एकच सूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2017 13:43 IST
क्रिती सॅनन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या रिलेशनशिपच्या कथा अधूनमधून आपल्या कानावर येत असतात.‘राबता’च्या सेटवर क्रिती व सुशांत एकत्र ...
क्रिती सॅनन व सुशांत सिंह राजपूतने आवळला एकच सूर!
क्रिती सॅनन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या रिलेशनशिपच्या कथा अधूनमधून आपल्या कानावर येत असतात.‘राबता’च्या सेटवर क्रिती व सुशांत एकत्र आले आणि दोघांमध्ये प्रेम बहरले. अर्थात सुशांत किंवा क्रिती यापैकी कुणीही हे मानायला तयार नाहीत. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, एवढे एकच तुणतुणे दोघे वाजवत आहेत. अलीकडे सुशांतला क्रितीबद्दलच्या रिलेशनबद्दल विचारण्यात आले. यावर सुशांतने सगळ्या चर्चा धुडकावून लावल्या. माझ्या व क्रितीबद्दलच्या चर्चा बºयाच इंटरेस्टिंग आहेत. मनोरंजक आहेत. पण सगळ्या खोट्या आहेत, असे सुशांत म्हणाला. आता केवळ सुशांतच नाही तर क्रितीनेही हाच सूर आवळला आहे. अलीकडे एका मुलाखतीत क्रितीही सुशांतप्रमाणेच बोलली. मी आणि सुशांत केवळ दोघे चांगले मित्र आहोत, यापेक्षा काहीही नाही. अशा चर्चांवर स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही. विशेष म्हणजे, या चर्चांनी आमच्या नात्यावर कुठलाही परिणाम होणे नाही. को-स्टारशी तुमचे नाव जोडणे जाणे, हे या इंडस्ट्रीमध्ये अतिशय कॉमन आहे, हे मी आत्तापर्यंत मला कळून आले आहे. म्हणून मी अशा चर्चांकडे दुर्लक्ष करते, असे ती म्हणाली.को-स्टारशी तुमचे नाव जोडणे जाणे, हे या इंडस्ट्रीमध्ये अतिशय कॉमन आहे, हे क्रितीचे म्हणणे तसे खोटेही नाही. पण हे जसे खोटे नाही, तसेच बॉलिवूडमध्ये अनेक कपल्स आपले रिलेशन लपवतात, हेही खोटे नाही. कदाचित सुशांत आणि क्रितीही हे दोघेही हेच करताहेत. पण शेवटी लपवून लपवून किती लपवणार? क्रिती व सुशांतने हेही समजून घेतले पाहिजे, केवळ इतकेच. लवकरच सुशांत व क्रितीचा ‘राबता’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.