Join us  

'गणपत'मधील क्रिती सनॉनचं मोशन पोस्टर रिलीज, पुन्हा एकदा झळकणार टायगर श्रॉफसोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 12:42 PM

क्रिती सनॉनचा आगामी चित्रपट 'गणपत'चं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनने हिरोपंती चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातून तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात तिच्यासोबत टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा क्रिती आणि टायगर रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते दोघे गणपत या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. यात क्रिती बाइकवर दमदार अंदाजात पोझ देताना दिसते आहे.

क्रिती सनॉनचा हा दमदार लूक टायगर श्रॉफने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या लूकला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. टायगर श्रॉफने मोशन पोस्टर शेअर करत लिहिले की, प्रतीक्षा संपली. या अभिनेत्रीसोबत पुन्हा काम करण्यासाठी खूप उत्साही आहे.

या व्हिडीओत क्रिती सनॉनचा लूक आणि स्टाईल खूपच दमदार वाटते आहे. तिच्या या लूकची तिचे चाहते खूप प्रशंसा करत आहेत. यापूर्वी टायगर श्रॉफने गणपतचा एक लूक शेअर केला होता. ज्यात एक मुलगी बाइकवर उभी दिसत होती. टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉन या जोडीला पुन्हा एकदा एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. 

याशिवाय क्रिती सनॉन लवकरच बच्चन पांडे चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शेवटची ती हाउसफुल ४ आणि पानिपतमध्ये झळकली होती. तर टायगर श्रॉफ शेवटचा बागी ३मध्ये दिसला होता.

टॅग्स :क्रिती सनॉनटायगर श्रॉफअक्षय कुमारहाउसफुल 4बागी ३पानिपत