Join us  

लंडनमध्ये १० वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत फिरतेय क्रिती सेनन? धोनीसोबत आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 4:22 PM

कोण आहे तो मिस्ट्री मॅन?

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री क्रिती सेनने (Kriti Sanon) आपल्या दमदार अभिनयामुळे वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. केवळ सौंदर्यच नाही तर तिच्यात टॅलेंटही पूरेपूर आहे हे तिने सिद्ध केलंय. 'हिरोपंती' मधून पदार्पण केल्यानंतर क्रितीने विविधांगी भूमिका साकारल्या. 'मिमी' सिनेमा तिच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरला कारण याच सिनेमासाठी तिला पुरस्कार मिळाला. क्रिती अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. 'आदिपुरुष' वेळी तिचं नाव प्रभाससोबत जोडलं गेलं होतं. पण आता ती दुसऱ्याच व्यक्तीला डेट करत असल्याची चर्चा आहे. कोण आहे तो प्रिन्स चार्मिंग?

क्रितीचा लंडन एक फोटो व्हायरल होतोय ज्यामध्ये ती मिस्ट्री मॅनसोबत फिरताना दिसत आहे. हा पाठमोरा फोटो असल्याने त्याचा चेहरा दिसत नाही. Reddit वर क्रितीचा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे की हा क्रितीचा कथित बॉयफ्रेंड आहे. इतकंच नाही तर त्याचं नावही समोर आलं आहे. कबीर बहिया जो ब्रिटनमध्ये राहणारा आहे. तसंच तो क्रितीपेक्षा १० वर्ष लहान आहे. इतकंच नाही तर कबीरचे वडील इंग्लंडमधील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत.

चर्चा अशीही आहे की कबीर दहिया आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यात जवळचं नातं आहे. धोनी आणि पत्नी साक्षीसोबत कबीरचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. कबीर साक्षीचा नातेवाईक असल्याचीही चर्चा आहे. तसंच त्याचे अनेक क्रिकेटपटूंसोबत फोटो आहेत. अर्थात अद्याप या सर्व गोष्टींवर अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  

क्रिती सेननचा काही महिन्यांपूर्वी 'तेरी बातो मे ऐसा उलझा जिया' सिनेमा रिलीज झाला होता. यामध्ये तिची शाहीद कपूरसोबत जोडी जमली होती. क्रिती सिनेमात रोबोट होती. प्रेक्षकांनी सिनेमा खूप एन्जॉय केला. आता तिचा 'द क्रू' हा सिनेमा रिलीज होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत करीना कपूर खान आणि तब्बू या अभिनेत्रीही आहेत.

टॅग्स :क्रिती सनॉनबॉलिवूडरिलेशनशिप