अभिनेत्री क्रिती सनॉनची बहीण नुपूर सनॉनचा नुकताच साखरपुडा झाला. बॉयफ्रेंड गायक स्टेबिन बेनने तिला रोमँटिक अंदाजात प्रपोज केलं. नुपूरसाठी हा अत्यंत भावनिक क्षण होता. गेल्या काही वर्षांपासून नुपूर आणि स्टेबिन एकमेकांना डेट करत होते. आता त्यांना नात्यात एकमेकांच्या साथीने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिती सनॉननेही बहीण आणि होणाऱ्या जिजूंना शुभेच्छा दिल्या आहेत. स्टेबिनच्या रोमँटिक प्रपोजलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नुपूर सनॉनने आज इन्स्टाग्रामवर प्रपोजलचे फोटो शेअर केले आहेत. नुपूर मित्रपरिवारासोबत व्हेकेशनवर असतानाच स्टेबिनने तिला प्रपोज केल्याचं दिसत आहे. ते एका जहाजावर आहेत. नुपूरने सुंदर प्रिंटेड लाँग गाऊन घातला आहे. तर स्टेहिन काळ्या रंगाच्या सूट बूटमध्ये आहे. पहिल्याच फोटोत स्टेबिन गुडघ्यावर बसून हातात अंगठी घेऊन तिला प्रपोज करत आहे. बाजूला काही लोक हातात 'माझ्याशी लग्न करशील का?'चे प्लेकार्ड घेऊन उभे आहेत. दुसऱ्या फोटोत नुपूरने सुंदर डायमंड रिंग फ्लॉन्ट केली आहे. तर आणखी एका फोटोत दोघं एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. शेवटच्या फोटोत क्रिती सनॉनचीही झलक दिसते ज्यात ती दोघांना मिठी मारत आहे. 'ज्या जगात कोणालाच कशाची खात्री नाही तिथे मी एकाला माझा सर्वात सोपा होकार दिला आहे'. असं कॅप्शन नुपूरने दिलं आहे. नुपूरच्या या फोटोंवर इंडस्ट्रीतील काही कलाकार आणि चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
'हिंदुस्तान टाइम्स'नुसार, नुपूर आणि स्टेबिन याच महिन्यात उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. ९ ते ११ जानेवारीपर्यंत त्यांच्या लग्नाचे फंक्शन्स होणार आहेत. फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी लग्नाला उपस्थित असतील. कारण दोघांना अतिशय इंटिमेट वेडिंग हवं आहे. तर १३ जानेवारीला त्यांचं मुंबईत रिसेप्शन होणार आहे. स्टेबिन बेन पॉप गायक आणि लाईव्ह परफॉर्मर आहे. त्याची 'साहिबा', 'रुला के गया इश्क', 'थोडा थोडा प्यार' सारखी काही गाणी गाजली आहेत.
Web Summary : Nupur Sanon got engaged to singer Stebin Ben after a romantic proposal. The couple, dating for years, will marry in Udaipur in January, followed by a Mumbai reception. Kriti Sanon shared her joy.
Web Summary : नुपुर सैनन ने गायक स्टेबिन बेन से रोमांटिक अंदाज में सगाई कर ली। सालों से डेट कर रहे यह जोड़ा जनवरी में उदयपुर में शादी करेगा, जिसके बाद मुंबई में रिसेप्शन होगा। कृति सैनन ने खुशी व्यक्त की।