Join us
Daily Top 2Weekly Top 5

​क्रिती सॅननची बहीण सुश्मिताच्या भावावर ‘फिदा’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 14:46 IST

अभिनेत्री क्रिती सॅनन हिची लाडकी बहीण नुपूर सॅनन सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे तिचे रिलेशन स्टेटस. होय, नुपूर ...

अभिनेत्री क्रिती सॅनन हिची लाडकी बहीण नुपूर सॅनन सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे तिचे रिलेशन स्टेटस. होय, नुपूर प्रेमात पडल्याची खबर आहे. म्हणजे तशी चर्चा आहे. एका लोकप्रीय अभिनेत्रीच्या भावाला नुपूर डेट करत असल्याचे समजते. आता ही अभिनेत्री कोण? तर अभिनेत्री सुश्मिता सेन.मीडियाचे मानाल तर नुपूर सेन सुश्मिताचा लहान भाऊ राजीव सेन याला डेट करतेय. राजीव हा दुबई काम करतो. दुबईतच एका पार्टीत राजीव व नुपूर या दोघांची भेट झाली. या पार्टीत राजीव सुश्मितासोबत आला होता  तर नुपूर क्रितीसोबत आली होती.पार्टीत नुपूर व राजीव यांची भेट झाली. पुढे मैत्री झाली. या मैत्रीचे आताश: प्रेमात रूपांतर झाल्याचे कळतेय. आता या बातमीत किती तथ्य ते आम्हाला माहित नाही. पण सध्या मीडियात नुपूर व राजीवच्या डेटींगची जोरात चर्चा आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून नुपूर बॉलिवूड डेब्यू करणार, असे कानावर येतेय. मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत नुपूरला सुद्धा बॉलिवूडमध्ये नशिब आजमावयाचे आहे. आता नुपूर बॉलिवूडमध्ये कधी येणार अन् किती यशस्वी होणार, हे ठाऊक नाही. पण नुपूरच्या प्रेमाची गाडी स्टेशनहून सुटलीय. ती मुक्कामापर्यंत पोहोचो, हीच शुभेच्छा.नुपूरप्रमाणेच क्रिती सुद्धा प्रेमात पडल्याची चर्चा आहेच. सुशांत सिंह राजपूत व क्रिती एकमेकांना डेट करत असल्याची बातमी कधीचीच व्हायरल झाली आहे. अर्थात क्रिती आणि सुशांत दोघेही यावर काहीही बोलायला तयार नाही. पण शेवटी प्रेम ते प्रेमचं. शेवटी ते कितीही लपवलं तरी लपत नाहीच!