Join us  

कृष्णा श्रॉफने ब्रेकअप आणि शेफसोबतच्या फोटोवर केला खुलासा, म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 9:46 AM

कृष्णा पोस्ट शेअर करत होती त्यावरून हेच वाटत होतं की, ती मुव्ह ऑन झाली आहे. ई टाइम्ससोबत बोलताना तिने पहिल्यांदा ब्रेकअपबाबत बातचीत केली आहे.

कृष्णा श्रॉफने काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेन्ड एबन हायम्ससोबत ब्रेकअप केलं होतं. त्यावरून ती चर्चेत होती. तिने त्याच्यासोबतचे सर्व इन्स्टा पोस्ट डिलीट केले होते. त्यानंतर ज्याप्रकारे कृष्णा पोस्ट शेअर करत होती त्यावरून हेच वाटत होतं की, ती मुव्ह ऑन झाली आहे. ई टाइम्ससोबत बोलताना तिने पहिल्यांदा ब्रेकअपबाबत बातचीत केली आहे.

सिंगल लाइफबाबत कृष्णाने सांगितले की, ही लाइफ शानदार आहे. ती म्हणाली, मला या गोष्टीचा आनंद आहे की, मी पूर्णपणे माझ्यावर आणि माझ्या बिझनेसवर फोकस करू शकते. आता कोणताही डिस्ट्रॅक्शन किंवा ड्रामा नाही. जे एका रिलेशनशिपमध्ये असतात. एबनपासून वेगळी का झाली यावर ती म्हणाली की, अनेक गोष्टी होत्या ज्यामुळे असं झालं. पण मला या गोष्टी खाजगी ठेवायच्या आहेत. मला वाटतं आम्हाला याची जाणीव झाली आहे की, आम्ही दोघांनी रिलेशनशिपमध्ये राहण्याऐवजी मित्र राहणं जास्त चांगलं होईल.

कृष्णाचा एक्स तिच्या संपर्कात आहे का? यावर ती म्हणाली की, हो..पण जास्त नाही. मला माझ्या एक्ससोबत मैत्री ठेवण्यात काहीच गैर वाटत नाही. सामान्यपणे त्या लोकांनाच यात अडचणी असतात. दरम्यान साल्ट बेसोबतचा तिचा फोटो व्हायरल झाला होता. त्याला भेटण्याचा अनुभव कसा होता यावर ती म्हणाली की, खरंच ते माझ्या जीवनातील सर्वात बेस्ट जेवण होतं. जेवण चांगलं असण्यासोबतच तो एक चांगलं परफॉर्मर आहे आणि गमतीदार आहे. तो फार फ्रेन्डली आहे आणि ३ कोर्स मील सर्व्ह करतो. पुन्हा रिलेशनशिपच्या प्रश्नावर ती म्हणाली की, सध्या तर माझ्या ब्रेकअपला एकच महिना झाला आहे. मला सध्या एकटीला एन्जॉय करायचं आहे आणि स्वत:ला वेळ द्यायचा आहे.

२०२० मध्ये तुझा सर्वात आवडती आणि नावडती गोष्ट कोणती? यावर कृष्णा म्हणाली की, २०२० मध्ये माझी आवडती वेळ ती होती जेव्हा मला परिवारासोबत रहायला मिळालं. या वेळात आम्ही जवळ आलोत. २०२० मधील सर्वात नावडता वेळ म्हणजे मी आठवडे ऑस्ट्रेलियात क्वारंटाइन होते. त्यानंतर मोठ्या पल्ल्याची फ्लाइट ज्यात कोणतीही सर्व्हिस किंवा मनोरंजन नव्हतं. 

टॅग्स :कृष्णा श्रॉफटायगर श्रॉफबॉलिवूड