Join us

Mithilesh Chaturvedi Death: ‘कोई मिल गया’ फेम अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन, बॉलिवूडवर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 10:18 IST

Mithilesh Chaturvedi Death: मिथिलेश चतुर्वेदी यांनी लखनौ येथे अखेरचा श्वास घेतला. मिथिलेश हे हृदयासंबंधी आजाराने ग्रस्त होते.

Mithilesh Chaturvedi Death: बॉलिवूड इंडस्ट्रीतून पुन्हा एक दु:खद बातमी आहे. लोकप्रिय अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन झालं. काल 3 ऑगस्टला लखनौ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिथिलेश हे हृदयासंबधी आजाराने ग्रस्त होते. त्यांचे जावई आशीष चतुर्वेदी यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला होता. यानंतर ते त्यांच्या मूळ गावी लखनौला शिफ्ट झाले होते. मिथिलेश यांनी सत्या, ताल,फिजा, कोई मिल गया आणि रेडी सारख्या सिनेमांत काम केले होते.

मोहल्ला अस्सी, फटा पोस्टर निकला हिरो या चित्रपटांतही ते झळकले. टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केले. नीली छतरी वाले या लोकप्रिय टीव्ही मालिकेत त्यांनी आत्माराम चौबेची भूमिका साकारली होती. 2016 साली सलीम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द कॉमेडी ऑफ एरर्स’ या नाटकात त्यांनी विलियम शेक्सपीअरची भूमिका केली होती. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी