रिपोर्टनुसार, विरूष्काच्या या रिसेप्शन सोहळ्यास बॉलिवूडसह क्रिकेटजगतातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. तसेच राजकीय नेतेही या सोहळ्याला हजेरी लावतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. या रिसेप्शनमध्ये टीम इंडियासह बीसीसीआयचे काही आॅफिशियल अधिकारी सहभागी होतील. त्याचबरोबर बॉलिवूड लिजेंड अमिताभ बच्चन यांच्यासह सलमान, शाहरूख आणि आमिर खान सहभागी होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, जहीर खान, वीरेंद्र सेहवाग, आशीष नेहरा यांच्यासह अनेक आजी-माजी खेळाडू उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, दिल्ली येथे झालेल्या रिसेप्शन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. त्यामुळे राज्यातील अनेक बडे नेते या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थित राहतील अशी चर्चा आहे. सूत्रानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सोहळ्याचे निमंत्रण दिले असून, ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या ११ डिसेंबर रोजी विरूष्काने इटली येथे लग्न केले होते. त्यानंतर दिल्ली येथे ग्रॅण्ड रिसेप्शन दिले होते. आता मुंबई येथे मित्रपरिवारासाठी रिसेप्शनचे आयोजन केले आहे.