Join us  

'कॉफी विथ करण'मध्ये आलियाची हुबेहूब नक्कल करत नीतू कपूर यांनी सांगितला खास किस्सा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 2:32 PM

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर आणि झीनत अमान या जोडीने 'कॉफी विथ करण सीझन 8' मध्ये हजेरी लावली.

बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या 'कॉफी विथ करण सीझन 8' या टॉक शोमुळे चर्चेत येत आहे. सध्या या शोचं 8 वं पर्व सुरु असून आतापर्यंत अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.  त्यामुळे या शोला प्रेक्षक कायम पसंतीत देतात. लेटेस्ट एपिसोडमध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर आणि झीनत अमान या जोडीने हजेरी लावली. यावेळी त्या बॉलिवूड आणि वैयक्तिक आयुष्याविषयी दिलखुलासपणे बोलताना दिसल्या. 

आलिया आणि रणबीरची लेक 'राहा' एक वर्षाची झाल्याबद्दल करण जोहरने नीतू कपूर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नात राहाविषयी बोलताना नीतू म्हणाल्या, 'राहा' हे नाव तिच्यासाठी खूप परफेक्ट आहे. तिच्याशी हे नाव पूर्णपणे जुळतं. तिचा इतका सुंदर, गोड, आनंदी चेहरा आहे की, तिला पाहिल्यानंतर खूप छान वाटतं. अगदी मनाला हायसं वाटतं'. तसेच करणनेही राहाच्या डोळ्याचं कौतुक केलं. 

पुढे नितू कपूर म्हणाल्या, आलियाची आई सोनी या राहाला 'मम्मा' (आई) म्हणायला शिकवतात. तर तिने पहिल्यांदा 'पप्पा' म्हणावं असा माझा हट्ट आहे. यावरून आम्ही भांडत असतो. नितू कपूर यांनी 'राहा'चा एक किस्सा आलियाची नक्कल करत सांगितला. एकदा मी घरी गेले. तर आलिया म्हणते, 'राहा म्हणाली 'मम्मा ' म्हणाली. तर मी तिला म्हटलं, तिने मम्मा नाही म्हटले आहे, तिने मम्म-म्म्म म्हटले आहे, त्यामुळे जास्त आनंदी होऊ नकोस'. 

नुकतेच 'राहा' ही नोव्हेंबर 2023 मध्ये एक वर्षाची झाली आहे.  बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. तर ख्रिसमस 2023 ला आलिया आणि रणबीर यांनी मुलीचा चेहरा पहिल्यांदा पापाराझीसमोर रिव्हिल केला होता.  दोघांनी राहासोबत पापाराझीला फोटोसाठी पोज दिल्या होत्या. यावेळी राहा ही व्हाईट फ्रॉक, दोन पोनी टेल आणि रेड शूज अशा क्युट लूकमध्ये दिसली. यानंतर तिचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. 

टॅग्स :नितू सिंगसेलिब्रिटीबॉलिवूडकरण जोहरआलिया भटरणबीर कपूर