Join us  

Koffee With Karan 6 : काय म्हणता? करण जोहरच्या ‘कॉफी’ला शाहरूख खानचा नकार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 10:50 AM

करण जोहरचा ‘कॉफी विद करण’चा सहावा सीझन तूर्तास बराच गाजतोय. करणच्या यंदाच्या या सीझनमध्ये बॉलिवूडच्या बड्या बड्या स्टार्सनी हजेरी लावली. पण बॉलिवूडच्या एका सुपरस्टारने म्हणे, करणची कॉफी पिण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्देसूत्रांचे मानाल तर गेल्या काही काळात करण व शाहरूख यांच्यातील अंतर वाढतेय. याचे कारण म्हणजे, किंग खानच्या प्रतिस्पर्ध्यांसोबत करणची वाढत चाललेली जवळीक.

करण जोहरचा ‘कॉफी विद करण’चा सहावा सीझन तूर्तास बराच गाजतोय. करणच्या यंदाच्या या सीझनमध्ये बॉलिवूडच्या बड्या बड्या स्टार्सनी हजेरी लावली. पण बॉलिवूडच्या एका सुपरस्टारने म्हणे, करणची कॉफी पिण्यास नकार दिला आहे. हा सुपरस्टार कोण, तर किंगखान शाहरूख खान. होय, डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या यंदाच्या सीझनमध्ये शाहरूखने यावे, अशी करणची मनापासून इच्छा आहे. करणने अनेकदा शाहरूखला शोमध्ये येण्याची विनंती केली. पण शाहरूख मात्र मानायला तयार नाही. याचे कारण काय असावे, तर शाहरूखचे करिअर.

होय, सध्या शाहरूखचे करिअर ब-याच वाईट फेजमधून जातेय. त्याचे अलीकडचे सगळेच चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटले. ‘हिरो’ या चित्रपटाची तर कधी नव्हे इतकी गत झाली. बरे इतके असूनही शाहरूखजवळ सध्या कुठलाही मोठा चित्रपट नाही. त्यामुळे करणच्या शोमध्ये जावून बोलायचे काय, असा प्रश्न म्हणे शाहरुखला पडलाय आणि याचमुळे तो या शोवर जाण्यास टाळाटाळ करताना दिसतोय.

सूत्रांचे मानाल तर गेल्या काही काळात करण व शाहरूख यांच्यातील अंतर वाढतेय. याचे कारण म्हणजे, किंग खानच्या प्रतिस्पर्ध्यांसोबत करणची वाढत चाललेली जवळीक. करण सध्या सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण, आमिर खान यांच्याकडे झुकतोय,असे शाहरूखला वाटतेय. ‘कॉफी विद करण’मध्ये अलीकडे अक्षय, आमिर, अजय असे सगळे येऊन गेलेत. आता अशात शाहरुख करणच्या ‘कॉफी विद करण’मध्ये हजेरी लावतो की नाही, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. 

टॅग्स :शाहरुख खानकरण जोहरकॉफी विथ करण 6