Join us

जाणून घ्या, ‘या’ सेलिब्रिटींना व्यसनांमुळे झाला मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 11:14 IST

अबोली कुलकर्णी बॉलिवूडची लिजेंड अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक बब्बर याने त्याच्या ड्रग्जच्या सवयीबद्दल एक ...

अबोली कुलकर्णी बॉलिवूडची लिजेंड अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक बब्बर याने त्याच्या ड्रग्जच्या सवयीबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे. ड्रग्जच्या आहारी गेल्यानंतर आयुष्य कसे उद्धवस्त होत गेले, हे सांगताना मी यातून सावरलो, मात्र कोणीही याच्या आहारी जावू नका असा सल्ला देत प्रतिकने ड्रग्जच्या व्यसनाची आपबीती सांगितली. आयुष्यात वारंवार मिळणारे अपयश, वैयक्तिक जीवनातील वाद-संघर्ष, ब्रेकअप्स, घटस्फोट, मनस्ताप या कारणांमुळे प्रतिक प्रमाणेच इतरही कलाकार व्यसनाच्या आहारी गेले आहेत. अर्थातच यामुळे त्यांचे करिअर भरकटले, तर काही सावरलेही. अशाच काही कलाकारांच्या आपबितीचा हा वृत्तांत...* फरदीन खान बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा म्हणजे फरदीन खान याला मुंबई पोलिसांनी ड्रग्जच्या आहारी गेल्याच्या कारणावरून ५ मे २००१ मध्ये पकडले होते. त्यानंतर तो जवळपास १ वर्ष ड्रग्जच्या व्यसनातून बाहेर काढणाऱ्या कोर्समध्ये असल्याचे समजतेय. २०१२ मध्ये मग त्याला जामीन मिळून त्याची सुटका झाली. याअगोदर तो २०१० मध्ये ‘दुल्हा मिल गया’ मध्ये दिसला होता.* संजय दत्तहिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार आणि राजकारणी सुनील दत्त यांचा मुलगा म्हणजे संजय दत्त अर्थात संजूबाबा. १९८२ मध्ये संजूबाबाला ड्रग्जच्या केसअंतर्गत ५ महिन्यांचा कारावास झाल्याचे कळतेय. त्यानंतर यूएसमध्ये असलेल्या एका ड्रग्ज सोडवण्यासाठीच्या सेंटरमध्ये त्याला नेण्यात आले. त्यानंतर अवैध शस्त्र बाळगण्याच्या केसप्रकरणात अडकत गेला. त्यानंतर या प्रकरणामुळे त्याला झालेल्या शिक्षेनंतर त्याची २५ फेब्रुवारीलाच सुटका झाल्याचे समजतेय.* हनी सिंगरॅपर आणि स्टार सिंगर हनी सिंग याचा प्रवास तुम्हाला माहितीये का? प्रेरणादायी असा त्याचा प्रवास असून त्यालाही ड्रग्जच्या आहारी गेल्याच्या कारणावरून पोलिसांनी पकडल्याचे समजतेय. त्यानंतर तो बऱ्याच गाण्यांमुळे चर्चेत आला. * गितांजली नागपालमॉडेल गितांजली नागपाल हिने सुष्मिता सेनसोबत रॅम्पवॉक केला होता. मात्र, ड्रग्जच्या अतिसेवनामुळे तिला रॅम्पवॉक करतांनाही त्रास होत असायचा. ड्रग्जच्या नशेत गितांजली कधी कधी रात्री पार्कमध्ये झोपायची तर कधी मंदिरांमध्ये झोपून रात्र काढायची. मग दुसऱ्या  दिवशी तिला टीव्ही कॅमेरामॅन, रिपोटर्स आणि रस्त्यांवरच्या दुकानदारांच्या प्रश्नांचा सामना करावा लागायचा, असे समजतेय.* राहूल महाजनफॉर्मर युनियन कॅबिनेट मिनिस्टर प्रमोद महाजन यांचा मुलगा राहूल महाजन हा काही बॉलिवूडचा स्टार नाही, पण नक्कीच एक चर्चेतील व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. मध्यंतरी तो ड्रग्जच्या विळख्यात चांगलाच अडकला होता. कोकेनच्या अतिरीक्त सेवनामुळे त्याला एकदा इर्मजन्सीमध्ये मेडिकल हेल्प घ्यावी लागली होती. २०१० मध्ये त्याने डिम्पी गांगुली हिच्यासोबत लग्न केले होते. तेव्हा तो भलताच चर्चेत होता.