रंगीला, सत्या, मस्त आदी चित्रपटांमधून झळकलेली मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावावर अनेक हिट सिनेमे जमा आहेत. वयाच्या ४२ व्या वर्षी उर्मिलाने उद्योगपती व मॉडेल मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर उर्मिला बॉलिवूडपासून दूर आहे. पण एकेकाळी उर्मिला यशाच्या शिखरावर होती. याच काळात तिच्या आयुष्यात एका व्यक्तिची एन्ट्री झाली. असे म्हणतात की, याच व्यक्तिमुळे उर्मिलाचे करिअर उद्धवस्त झाले. ही व्यक्ती कोण तर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा.
होय, ‘रंगीला’ हिट झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये दबक्या आवाजात उर्मिला व राम गोपाल वर्मा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. राम गोपाल वर्मा यांनी एका चित्रपटातून ऐनवेळी माधुरी दीक्षितला हटवून उर्मिला साईन केले आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चांना जोर चढला. पुढे राम गोपाल वर्मांच्या प्रत्येक सिनेमात उर्मिला झळकू लागली. एकंदर काय तर राम गोपाल वर्मा यांनी उर्मिलाला यशाच्या शिखरावर नेऊन उभे केले. पण पुढे याच राम गोपाल वर्मामुळे उर्मिलाच्या करिअरला ओहोटी लागली.
2014 मध्ये ‘अजुबा’ या चित्रपटातून उर्मिलाने कमबॅक केले. पण तिचे हे कमबॅक अपयशी ठरले. 2018 मध्ये ‘ब्लॅकमेल’ सिनेमात एक आयटम साँग करताना दिसली. पण तिला कुणीही म्हणावे तसे नोटीस केले नाही.