Join us

​‘झिंग झिंग झिंगाट’वरून निघाल्या चाकू-कु-हाडी! रक्ताने लाल झाला लग्नमंडप!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 10:44 IST

‘सैराट’ या चित्रपटातील ‘झिंग झिंग झिंगाट...’ आठवते. हे गाणे लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. पण हेच गाणे अलीकडे एका भांडणाचे ...

‘सैराट’ या चित्रपटातील ‘झिंग झिंग झिंगाट...’ आठवते. हे गाणे लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. पण हेच गाणे अलीकडे एका भांडणाचे कारण ठरले. होय,‘झिंग झिंग झिंगाट...’ आणि ‘जय जय महाराष्ट्र’ ही दोन गाणी एका मोठ्या भांडणाचे कारण बनलेत. कु-हाडी आणि चाकूंनी वार करीत एकमेकांवर तुटून पडण्याइतपत हे भांडण विकोपाला गेले. यात नऊ जण गंभीर जखमी झालेत. मुंबईच्या डोंबिवली भागात एका प्री-वेडिंग पार्टीत ही घटना घडली.गत ६ मार्चला रतन म्हात्रे यांच्या मुलाचे लग्न होते. या लग्नाच्या आनंदात ४ मार्चला रतन म्हात्रे यांनी मित्र-मंडळींसाठी एक पार्टी ठेवली. रात्र आणि मद्याची चढत गेली तशी पार्टी रंगात आली. डिजेच्या तालावर सगळेच ‘सैराट’ झाले असताना, पहाटेच्या सुमारास नवरदेवाचे मित्र आणि नातेवाईकांमध्ये जुंपली. कारण होते, गाणे. नवरदेवाच्या काही मित्रांना ‘झिंग झिंग झिंगाट...’वर नाचायचे होते. पण काहींची ‘झिंग झिंग झिंगाट...’ची झिंग उतरली होती. त्यांना डिजे वर ‘जय जय महाराष्ट्र’ हे गाणे हवे होते. बस्स, इथून वाद सुरु झाला आणि काहीच क्षणात पार्टीचा बेरंग होत, प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. सुमारे १५ जण आपआपसांत भिडले. काहींनी कुºहाडी काढल्या, काहींनी चाकू काढले आणि लग्नमंडप रक्ताने माखला. या धिंगाण्यात नऊ जण गंभीर जखमी झालेत.शुद्धीवर असलेल्या काहींनी लगेच पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी दारूच्या नशेत अगदी तुल्ल होते. त्यांच्यानी साधे उभे राहणेही होत नव्हते. पोलिसांनी तात्काळ जखमींना रूग्णालयात हलवले.