Join us  

KKBKKJ Twitter Review: क्या बोलती है पब्लिक? कसा वाटला भाईजानचा 'किसी का भाई किसी की जान'? वाचा ट्विटर रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 12:21 PM

Kisi ka Bhai Kisi ki jaan Twitter Review: सलमान खानचा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' आज प्रदर्शित झालाये. सिनेमा रिलीज होताच सल्लू भाईच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पाेहोचला आहे. ट्विटरवर सकाळपासून चित्रपटाचे अनेक स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ शेअर होत आहेत...

Kisi ka Bhai Kisi ki jaan Twitter Review: सलमान खानचा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट  'किसी का भाई किसी की जान' आज प्रदर्शित झालाये. ईदच्या एकदिवस आधी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा होती. सिनेमा रिलीज होताच सल्लू भाईच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पाेहोचला आहे. ट्विटरवर सकाळपासून चित्रपटाचे अनेक स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ शेअर होत आहेत. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणारे नेटकरी आपआपले रिव्ह्यू देत आहेत. अनेकांनी ट्विटरवर आपला रिव्ह्यू शेअर केला आहे. अनेकांनी चित्रपट पाहून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. सल्लूच्या डाय हार्ड फॅन्सला हा सिनेमा भलताच आवडला आहे. अनेकांनी मात्र 'किसी का भाई किसी की जान'चा इंटरव्हल खुपच खराब असल्याचं म्हटलं आहे.

तेव्हा पाहू यात ट्विटरवरचे चाहत्यांचे काही रिव्ह्यू...

 काहींना सिनेमाचा फर्स्ट हाफ जबरदस्त असल्याचं म्हटलं आहे. पण सेकंड हाफ तितकाच बोरिंग असल्याचा रिव्ह्यू दिला आहे. एका युजरने चित्रपटाला डिझास्टर म्हटलं आहे. काहींना या चित्रपटातील सलमानची कॉमेडी आणि अ‍ॅक्शन सीन्स खुप आवडले आहे. काहींना सिनेमातील सलमानचा रोमॅन्टिक अंदाज अजिबात आवडलेला नाही. सलमान ८० वर्षांच्या म्हाताऱ्यासारखा दिसतोय. अरे भाईसाहब, तू ६० व्या वर्षी आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या हिरोईनसोबत रोमान्स कसा करू शकतोस, असा सवाल एका युजरने विचारला आहे. सलमान खान प्रॉडक्शनच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाचं दिग्दर्शन फरहाद सामजीनं केलं आहे.  सलमान खान,व्यंकटेश दग्गुबाती,पूजा हेगडे,जगपति बाबू,भूमिका चावला,विजेंदर सिंग,अभिमन्यु सिंग,राघव जुयाल,सिद्धार्थ निगम,जस्सी गिल,शहनाज गिल,पलक तिवारी आणि विनाली भटनागर अशी भलीमोठी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो ते बघूच.

टॅग्स :सलमान खानपूजा हेगडेबॉलिवूडट्विटर