Join us  

Kishore Kumar Birth Anniversary : चार लग्नं, दोन घटस्फोट... किशोर कुमार यांच्या वैवाहिक आयुष्याची वाचा कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 10:44 AM

Kishore Kumar Birth Anniversary : आपली गाणी आणि अभिनयामुळे किशोर कुमार जेवढे चर्चेत राहीले तेवढेच ते आपल्या प्रेमप्रकरणांसाठीही चर्चेत राहिले.

Kishore Kumar Birth Anniversary : आपल्या गाण्यांनी संपूर्ण देशाला आजही आपली दखल घ्यायला भाग पाडणारे दिग्गज पार्श्वगायक आणि अभिनेते कुशोर कुमार यांची आज जयंती. आज ते आपल्यासोबत नसले तरिही त्यांच्या गाण्यांनी आजही लोकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे. आपली गाणी आणि अभिनयामुळे ते जेवढे चर्चेत राहीले तेवढेच ते आपल्या प्रेमप्रकरणांसाठीही चर्चेत राहिले. जाणून घेऊयात किशोर कुमारांच्यारिलेशनशिपबाबत....

किशोर कुमार यांचं पहिलं लग्न 1951मध्ये अभिनेत्री रूमा गुहा यांच्यासोबत झाले होते. त्यावेळी किशोर दा बॉलिवूडमध्ये इतके नावाजलेले नव्हते. लग्नाच्या आठ वर्षांनंतर 1958मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. याचं मुख्य कारण म्हणजे, किशोर दा आणि रूमा यांच्यातील करिअरबाबत झालेले वाद. खरं तर किशोर यांना लग्नानंतर रूमाने घर सांभाळावं असं वाटत होतं. पण रूमाला मात्र चित्रपटसृष्टीमध्ये आपलं नाव कमावायचं होतं. 

(Kishore Kumar Birth Anniversary : आपल्या तत्वांसाठी इंदिरा गांधींच्याही विरोधात गेले होते किशोर कुमार!)

रूमाशी घटस्फोट झाल्यानंतर किशोर कुमार यांनी प्रसिद्ध सिने अभिनेत्री मधुबाला यांच्याशी विवाह केला. त्यावेळी मधुबालाने आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केलं होतं. त्यावेळी मधुबालासोबत आणखी एक अभिनेत्री आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जात होती, ती म्हणजे मुमताज. पण मुमताज यांच्यावर किशोर कुमार आपली छाप पाडू शकले नाहीत. दरम्यान मधुबाला आणि त्याचं नातं मधुबालाच्या घरच्यांनी कधीही स्विकारलं नाही. पण किशोर कुमार यांचा मधुबालासोबतचा संसार फार काळ चालला नाही कारण हृदयाला असलेल्या छिद्रामुळे मधुबाला यांचं निधन झालं आणि त्यांनीही अर्ध्यातच किशोर दांची साथ सोडली. 

मधुबाला यांच्या निधनानंतर किशोर कुमार यांच्या आयुष्यात योगिता बाली आल्या. या दोघांमधील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर दोघांनी लग्नही केलं. 1976मध्ये दोघांनी लग्न केलं त्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच यांचा संसार मोडला आणि त्यांनंतर योगिता बाली यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्याशी लग्न केलं होतं. 

(Kishore Kumar Birth Anniversary : गायक किशोर कुमार यांनी गायलेली मराठी गाणी ऐकलीत का?)

योगिता यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर किशोर यांच्या आयुष्यात अभिनेत्री लीना चंदावरकर यांची एन्ट्री झाली. आयुष्यात चौथ्यांदा आणि शेवटचं लग्न किशोर कुमार यांनी लीना सोबत केलं. या दोघांना एक मुलगाही असून त्याचं नाव सुमित कुमार आहे. लीना आणि किशोर यांच्या वयात 21 वर्षांचं अंतर होतं. त्यामुळे किशोर यांचे आई-वडील या नात्याच्या विरोधात होते.

टॅग्स :किशोर कुमारबॉलिवूडरिलेशनशिप