Join us

​ असे होते किंगफिशर कॅलेंडरचे फोटोशूट! पाहा, व्हिडिओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 13:18 IST

मॉडेलिंग विश्वापासून तर बॉलिवूडपर्यंत सगळ्यांचेच या कॅलेंडरसाठी दरवर्षी होणा-या मॉडेल निवडीपासून तर या कॅलेंडरच्या फोटोशूटपर्यंत सगळ्या घडामोडींकडे लक्ष असते.

दरवर्षी नववर्षाच्या तोंडावर किंगफिशर कॅलेंडरची चर्चा रंगते. २०१८ मध्येही ही चर्चा रंगते आहेत. मॉडेल बनण्याचे स्वप्न पाहणा-या प्रत्येक तरूणीची या कॅलेंडरवर झळकण्याची धडपड असते. साहजिकच मॉडेलिंग विश्वापासून तर बॉलिवूडपर्यंत सगळ्यांचेच या कॅलेंडरसाठी दरवर्षी होणा-या मॉडेल निवडीपासून तर या कॅलेंडरच्या फोटोशूटपर्यंत सगळ्या घडामोडींकडे लक्ष असते. या कलेंडर्ससाठी मॉडेल्सची निवड कशी होते, त्याचे फोटोशूट कसे होते, हे आपल्याला माहित असण्याचे कारण नाही. पण म्हणून याबद्दलचे कुतूहल लपून राहिलेले नाही. हे कुतूहल लक्षात घेत, विजय मल्लयाने त्याच्या सोशल अकाऊंटवर या कॅलेंडरच्या मेकिंग व्हिडिओ शेअर केला आहे. मद्यसम्राट विजय माल्याला देशाच्या न्यायालयाने ‘फरार’ घोषित केले आहे. पण तो कायम या ना त्या कारणाने चर्चेत असतो. मंगळवारी संध्याकाळी उशीरा त्याने तीन टिष्ट्वट केले आणि यात किंगफिशरचा मेकिंग व्हिडिओ शेअर केला. किंगफिशर कॅलेंडर माल्याच्या युबी ग्रूपद्वारे पब्लिश केले जाते. हे कॅलेंडर फिमेल मॉडेल्ससाठी बेस्ट लॉन्चिंग प्लॅटफॉर्म मानले जाते. २००३ मध्ये या कॅलेंडरची सुरूवात झाली होती. किंगफिशर कॅलेंडरला अनेक लोक अश्लिल म्हणतात. पण माल्या याला वूमन एम्पावरमेंट म्हणतो.या व्हिडिओमध्ये यंदाच्या किंगफिशर कलेंडरसाठी झालेल्या फोटोशूटची एक झलक आपण पाहू शकणार आहोत. कोर्सिकाच्या समुद्र किनाºयावर झालेल्या या फोटोशूटमधील मॉडेल्सचा अंदाज बघण्यासारखा आहे. यात इशिका शर्मा हिच्याशिवाय प्रियंका मूडले, प्रियंका करूणाकर आणि मिताली रैनोरे दिसताहेत.साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये वाढलेली मॉडेल प्रियंका मुडले  भारतात आपले करिअर बनवू इच्छिते. अनामिका खन्ना, मनीष मल्होत्रा अशा दिग्गज फॅशन डिझाईनर्सच्या फॅशन शोमध्ये ती दिसली आहे. मुंबईची प्रियंका करूणाकरण मॉडेलिंगसोबतच अ‍ॅक्टिंगही करते. ‘बिष्ट प्लीज’ या वेबसीरिजमध्ये ती परनिकाच्या रोलमध्ये दिसली होती. मराठी मुलगी मिताली रनुरे ही सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसतेय. मिताली ही मॉडेलिंगच्या दुनियेतील एक नावाजलेले नाव आहे.  सेलिब्रिटी फोटोग्राफर अतुल कसबेकरने हे फोटोशूट केले आहे.