Join us

'बादशाह' बनणार 'गाइड' !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 12:09 IST

बॉलीवुडचा बादशाह शाहरुख खान आता गाइड बनणार आहे. इम्तियाज अलीच्या आगामी सिनेमात किंग खान ही भूमिका साकारणार आहे. यांत ...

बॉलीवुडचा बादशाह शाहरुख खान आता गाइड बनणार आहे. इम्तियाज अलीच्या आगामी सिनेमात किंग खान ही भूमिका साकारणार आहे. यांत शाहरुखची टूरिस्ट अभिनेत्री अनुष्का शर्मा बनणार आहे. या भूमिकेसाठी इम्तियाजची लकी गर्ल दीपिका पादुकोणवर मात करत अनुष्कानं बाजी मारलीय. या सिनेमाची कथा एका गाइड आणि टूरिस्टच्या प्रेमकथेवर आधारित असेल. देवानंद यांचा गाइड आणि आमिर खानचा राजा हिंदुस्थानी सिनेमाची कथाही गाइडवरच आधारित होती. आता या जुन्या विषयाला इम्तियाज किती क्रिएटिव्हपणे रसिकांपुढे आणतो ते पाहावं लागेल.