Join us
Daily Top 2Weekly Top 5

किआरा आडवाणी ‘मशीन’साठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 16:35 IST

बॉलीवूडमध्ये नव अभिनेत्रींसाठी चांगले दिवस आल्याचे दिसतेय.  आगमी धोनी बायोपिकमध्ये धोनीच्या पत्नीची भूमिका साकारणारी अ‍ॅक्ट्रेस किआरा आडवाणी आता तिच्या ...

बॉलीवूडमध्ये नव अभिनेत्रींसाठी चांगले दिवस आल्याचे दिसतेय.  आगमी धोनी बायोपिकमध्ये धोनीच्या पत्नीची भूमिका साकारणारी अ‍ॅक्ट्रेस किआरा आडवाणी आता तिच्या पुढच्या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे.दिग्दर्शक जोडी अब्बास-मस्तान यांच्या आगामी ‘मशीन’ नावाच्या चित्रपटात किआरा मुख्य अभिनेत्री आहे. नुकतेच तिने याची अमेरिकेतील जॉर्जिया शहरातील शूटींग पूर्ण केली. यानिमित्ताने  तिने दिग्दर्शकासह संपूर्ण टीमला जेवणाची पार्टी दिली.चित्रपटातून अब्बास यांचा मुलगा मुस्तफा बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. सुशांतसिंग राजपुत सोबतची तिची केमिस्ट्री सध्या चांगलीच गाजत आहे.ती म्हणते, ‘धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तो एक अत्यंत चांगला व्यक्ती असून साक्षीला भेटून मी तिच्याविषयी जाणून घेतेले. तिच्या भूमिकेला पुरेपुर न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आहे.’