Join us  

ना प्रियंका ना करीना, रणवीर सिंहच्या Don 3मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, फरहान अख्तरची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 11:25 AM

Don 3 मध्ये जंगली बिल्ली म्हणजेच 'डॉन' ची हिरोईन कोण असणार?

हिंदी सिनेमातील सीक्वेल्समध्ये सर्वात गाजलेला सिनेमा म्हणजे 'डॉन'(Don). अमिताभ बच्चन यांच्या 'डॉन' नंतर बऱ्याच वर्षांनी शाहरुख खानने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर 'डॉन' जीवंत केला. शाहरुखला या रुपात चाहत्यांनी खूप पसंत केले. फरहान अख्तर दिग्दर्शित'डॉन' आणि 'डॉन 2' अशा दोन सिनेमांनंतर शाहरुखने ही फ्रँचायझी सोडली. आता रणवीर सिंह (Ranveer Singh) 'डॉन' साकारणार असल्याची घोषणा मेकर्सने केली. यानंतर सिनेरसिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या. तर आता मेकर्सने 'डॉन 3' (Don 3) मध्ये जंगली बिल्ली म्हणजेच 'डॉन' ची हिरोईन कोण असणार याचीही घोषणा केली आहे. 

'डॉन' आणि 'डॉन 2' मध्ये शाहरुख खानसोबत प्रियंका चोप्राने दमदार अभिनय केला होता. तिला 'जंगली बिल्ली' म्हणून चांगलीच लोकप्रियता मिळाली. डॉन  मध्ये करीना कपूरही दिसली. तर आता 'डॉन 3' रणवीर सिंहच्या अपोझिट कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. अखेर ते नाव समोर आलं आहे. शाहरुखनंतर प्रियंकाही डॉन फ्रँचायझीमधून बाहेर पडली आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन 3' मध्ये कियारा अडवाणीची (Kiara Advani) एन्ट्री झाली आहे. एक्सेल एंटरटेन्मेंटने नुकतंच सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ही घोषणा केली आहे. फरहान अख्तरनेही ट्वीट करत 'डॉन' युनिव्हर्समध्ये कियाराचं स्वागत केलं आहे. तसंच या निमित्ताने रणवीर सिंह आणि कियारा पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

'डॉन 3' ची घोषणा झाली असली तरी सिनेमासाठी प्रेक्षकांना बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. 2025 पर्यंत तरी सिनेमाचं शूटिंग सुरु होण्याचे चिन्ह नाहीत अशी माहिती फरहान अख्तरनेच दिली आहे. सध्या 'डॉन 3'च्या या अपडेटवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अजूनही चाहत्यांना शाहरुखलाच 'डॉन' म्हणून बघायची इच्छा आहे. त्यामुळे रणवीरला प्रेक्षकांनी अजूनही स्वीकारलेले नाही. आता रणवीरची मेहनत फळाला येते का हे काही वर्षात कळेलच. शिवाय रणवीर-कियाराची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :कियारा अडवाणीरणवीर सिंगफरहान अख्तरसिनेमा