Join us  

Kiara Advani Birthday Special : कियारा अडवाणी या अभिनेत्रीच्या भावासोबत होती नात्यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 5:57 PM

कियाराने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला, त्यावेळी एका अभिनेत्रीच्या भावासोबत तिचे अफेअर असल्याचे म्हटले जात होते.

ठळक मुद्देकियारा सोनम कपूरचा कझिन मोहित मारवाहसोबत नात्यात असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. त्या दोघांनी फुगली या चित्रपटात एकत्र काम केले होते. मोहितच्या लग्नानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. 

कियारा आडवाणीने खूपच कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले असून आज म्हणजेच ३१ जुलैला तिचा वाढदिवस आहे. फग्ली या चित्रपटापासून कियाराने करियरला सुरुवात केली. त्यानंतर मशिन या चित्रपटात ती झळकली. या दोन्ही चित्रपटामुळे तिला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. लस्ट स्टोरीमुळे प्रेक्षकांनी तिची चांगलीच दखल घेतली. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता एम एस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे मिळाली. तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कबीर सिंग या चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटातील कियाराची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या चित्रपटातील तिच्या लूक्सची देखील चांगलीच चर्चा होत आहे.

कियाराने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला, त्यावेळी एका अभिनेत्रीच्या भावासोबत तिचे अफेअर असल्याचे म्हटले जात होते. कियारा सोनम कपूरचा कझिन मोहित मारवाहसोबत नात्यात असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. त्या दोघांनी फुगली या चित्रपटात एकत्र काम केले होते. मोहितच्या लग्नानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. 

कियारा आडवाणीचे खरे नाव कियारा नसून आलिया असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे. तिने तिचे हे नाव इंडस्ट्रीत येण्यासाठी बदलले. पण तिने हे नाव बदलण्यामागे एक खास कारण आहे आणि विशेष म्हणजे हे नाव बदलण्यामागे बॉलिवूडमधील एक अभिनेता आणि अभिनेत्री आहे. कियाराने याविषयी मुलाखतीत सांगितले होते. 

कियारा सांगते, माझे खरे नाव आलिया आहे. पण आलिया भट ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असल्याने सलमान खानने मला नाव बदलण्याचे सुचवले. सलमानचे म्हणणे होते की, एकाच नावाच्या दोन अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असू शकत नाहीत. त्याने मला नाव बदलायला सुचवले असले तरी नवीन नाव काय ठेवायचे हे मी ठरवले. कियारा हे नाव मला आवडत असल्याने मी कियारा या नावाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. आता तर माझे आई-वडील देखील मला आलिया नव्हे तर कियारा या नावाने हाक मारू लागले आहेत.

टॅग्स :कियारा अडवाणीसलमान खानआलिया भटसोनम कपूर