अक्षय कुमारचा नुकताच रिलीज झालेला ‘केसरी’ हा सिनेमा एकीकडे बॉक्स आॅफिसवर धूम करतोय. दुसरीकडे अक्षय नव-नव्या चित्रपटांची घोषणा करतोय. सध्या अक्षयकडे एकापेक्षा एक उत्तम प्रोजेक्ट आहेत. आता यात आणखी एकाची भर पडली आहे.होय, ‘कंचना (मुनी)’ या साऊथच्या सुपरडुपर हिट हॉरर कॉमेडी चित्रपटाचा रिमेक येतोय आणि यात अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी’ असल्याचे कळतेय. आता या चित्रपटासाठी हिरोईनही फायनल झाली आहे. सूत्रांचे मानाल तर ‘कंचना (मुनी)’च्या रिमेकमध्ये कियारा अडवाणीचे नाव फायनल केले गेले आहे. अभिनेता आर. माधवन यालाही या चित्रपटाची आॅफर मिळाली आहे.
‘कंचना’च्या रिमेकमध्ये अक्षय कुमारसोबत दिसणार कियारा अडवाणी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 15:50 IST
होय, ‘कंचना (मुनी)’ या साऊथच्या सुपरडुपर हिट हॉरर कॉमेडी चित्रपटाचा रिमेक येतोय आणि यात अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी’ असल्याचे कळतेय. आता या चित्रपटासाठी हिरोईनही फायनल झाली आहे.
‘कंचना’च्या रिमेकमध्ये अक्षय कुमारसोबत दिसणार कियारा अडवाणी!!
ठळक मुद्देरोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हातावेगळा करताच अक्षय या रिमेकचे काम सुरु करणार आहे. आधी या रिमेकमध्ये शोभिता धूपिया दिसणार, अशी खबर होती