Join us  

आरती छाबरियाने गुपचूप उरकले लग्न, पाहा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 2:32 PM

‘आवारा पागल दीवाना’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसलेली अभिनेत्री आरती छाबरिया हिने नुकतीच गुपचूप लग्नगाठ बांधली.

ठळक मुद्देबॉलिवूडमध्ये सलमान खान, अक्षय कुमार, सनी देओल, अनिल कपूर अशा बड्या बड्या स्टार्ससोबत आरती दिसली आहे.

‘आवारा पागल दीवाना’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसलेली अभिनेत्री आरती छाबरिया हिने नुकतीच गुपचूप लग्नगाठ बांधली.  विशारद बीडेसी (visharad beedassy) याच्यासोबत आरतीने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. ‘खतरों के खिलाडी 4’ हा शो जिंकल्यानंतर आरती बॉलिवूडमध्ये दिसली नाही. गत 11 मार्चला आरतीने मॉरिशसमध्ये साखरपुडा केला होता. यानंतर गत 24 जूनला आरतीचा विवाहबंधनात अडकली. तूर्तास आरतीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आरतीच्या लग्नात अनेक टीव्ही स्टार्सनी हजेरी लावली. आरतीचा पती विशारद पेशाने टॅक्स कन्सल्टंट आहे. मॉरिशसमध्ये त्याचा मोठा बिझनेस आहे. पण आरतीसोबत लग्न केल्यानंतर तो मुंबईत शिफ्ट होणार आहे. विशारदला बिझनेससंदर्भात सतत प्रवास करावा लागतो. पण मुंबईत शिफ्ट होण्यास त्याला कुठलीही अडचण नाही.

आरतीने लज्जा, शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला, पार्टनर, मिलेंगे मिलेंगे अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘खतरों के खिलाडी 4’ आणि ‘झलक दिखला जा 6’ या रिअ‍ॅलिटी शोमध्येही तिने भाग घेतला होता. कॉमेडी नाईट्स बचाओ आणि डर सबको लगता है या टीव्ही शोमध्येही ती झळकली होती.

 ‘डर सबको लगता है’ या छोट्या पडद्यावरच्या मालिकेत आरती अखेरची  दिसली होती.सन २००२ मध्ये ‘तुम से अच्छा कौन है’ या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरूवात केली होती.

बॉलिवूडमध्ये सलमान खान, अक्षय कुमार, सनी देओल, अनिल कपूर अशा बड्या बड्या स्टार्ससोबत आरती दिसली आहे. २०१० मध्ये आलेल्या ‘दस तोला’ या चित्रपटानंतर आरती बॉलिवूडमधून जणू गायब झाली. या चित्रपटात तिच्या अपोझिट मनोज वाजपेयी लीड रोलमध्ये होता. 

टॅग्स :आरती छाबरिया