Join us
Daily Top 2Weekly Top 5

KBC Juniors: इस्रो जॉईन करणार! ११ वर्षाच्या स्पर्धकाच देशप्रेम पाहून 'बिग बीं'चाही उर अभिमानानं भरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 13:06 IST

बॉलीवुड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती ज्युनिअर्स 'शो' चांगलाच चर्चेत आला आहे. या 'शो'मध्ये छोट्या स्पर्धकांची उत्तर चर्चेत असतात.

बॉलीवुड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती ज्युनिअर्स 'शो' चांगलाच चर्चेत आला आहे. या 'शो'मध्ये छोट्या स्पर्धकांची उत्तर चर्चेत असतात. या शो'मधील उत्तरांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या एका ११ वर्षाच्या मुलाने दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत बिग बींनी त्या मुलाला सॅल्युट केल्याचे दिसत आहे. 

कौन बनेगा करोडपतीच्या फास्टेस्ट फिंगर्सची पहिली फेरी जिंकल्यानंतर ११ वर्षीय आदित्य श्रीवास्तव हॉट ​​सीटवर पोहोचला. आदित्यने अमिताभ बच्चन यांनाही  बोलण्याने आणि ज्ञानाने आश्चर्यचकित केले. दिवसभर त्याच्यासोबत बसून बोलावेसे वाटत असल्याचे अमिताभ यांनी सांगितले.

प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हॉट सीटवर बसलेल्या आदित्यबद्दल प्रेक्षकांना माहिती देत असल्याचे दिसत आहे. 'आदित्य 11 वर्षांचा आहे आणि तो स्पेसचे स्वप्न पाहतो. काल तो म्हणाला होता की तो मोठा झाल्यावर त्याला नासामध्ये जायचे नाही, तर आदित्यला भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो जॉईन करायची आहे. कारण त्याला देश आणि अवकाश दोन्ही आवडतात, असंही अमिताभ बच्चन यांनी सांगितले. 

सुशांत सिंग राजपूतनंतर Rhea Chakraborty पुन्हा पडली प्रेमात, या अभिनेत्रीच्या भावाला करतेय डेट

आदित्यचे कौतुक अमिताभ यांनी केले आहे.आदित्यच्या विचारसरणीला सलाम करूया. यानंतर 11 वर्षांचा आदित्य अमिताभ यांना स्पेसबद्दल काही खास गोष्टी सांगतो, ज्यावर अमिताभ बच्चन हसतात आणि म्हणतात – दिल तो करता है दिवसभर फक्त तुझ्याशीच बोलू. अमिताभ बच्चन जेव्हाही आदित्यला कोणताही प्रश्न विचारायचे तेव्हा तो पर्याय न ऐकताच उत्तर देतो.

11 वर्षाच्या मुलाचे एवढे प्रचंड ज्ञान पाहून अमिताभ स्तब्ध झाले, 'तुम्हाला आणखी ज्ञान द्यायचे आहे का? असंही अमिताभ म्हणतात. थेट साडेसात कोटी द्या म्हणतात. यानंतर, जेव्हा अमिताभ आदित्यला पुढचा प्रश्न विचारतात तेव्हा पर्याय न ऐकता तो म्हणतो की मला उत्तर माहित आहे. अमिताभ पुन्हा स्तब्ध झाले आणि सीट सोडतात. अमिताभ आणि स्पर्धकामध्ये असा खेळ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल.

टॅग्स :अमिताभ बच्चनकौन बनेगा करोडपती