सुशांत सिंग राजपूतनंतर Rhea Chakraborty पुन्हा पडली प्रेमात, या अभिनेत्रीच्या भावाला करतेय डेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 12:46 PM2022-12-08T12:46:01+5:302022-12-08T12:46:37+5:30

Rhea Chakraborty New Boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीचं नाव घेतल्यावर पहिला विचार येतो सुशांत सिंग राजपूतचा. सुशांतला डेट करणारी ही अभिनेत्री त्याच्या मृत्यूनंतर आता पुन्हा प्रेमात पडली आहे.

After Sushant Singh Rajput, Rhea Chakraborty fell in love again, dating the actress's brother | सुशांत सिंग राजपूतनंतर Rhea Chakraborty पुन्हा पडली प्रेमात, या अभिनेत्रीच्या भावाला करतेय डेट

सुशांत सिंग राजपूतनंतर Rhea Chakraborty पुन्हा पडली प्रेमात, या अभिनेत्रीच्या भावाला करतेय डेट

googlenewsNext

रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. जिला २०२० साली अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूसाठी कुठेतरी जबाबदार मानले जात होते आणि या आरोपांमुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला होता. रिया सुशांतच्या प्रेमात होती पण आता सुशांतच्या जाण्याच्या जवळपास दोन वर्षांनी रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. ती कुणाला तरी डेट करत आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. रिया ज्या व्यक्तीला डेट करत आहे तो एका लोकप्रिय ओटीटी अभिनेत्रीचा भाऊ आहे आणि मुंबईतील एक मोठा उद्योगपती आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंग राजपूतला डेट करणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा प्रेमात पडली आहे आणि आता ती दुसऱ्या कोणाला तरी डेट करते आहे. रिया ज्या व्यावसायिकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे तो इंडस्ट्रीतील एका मोठ्या टॅलेंट मॅनेजमेंट एजेन्सीचा मालक आहे आणि रिया ही त्याच्या ग्राहकांपैकी एक आहे. सुशांतच्या आकस्मिक मृत्यूमुळे रियाला संकटांनी घेरले होते तेव्हा हा व्यावसायिक तिचा आधार बनला होता.

रियाचा नवा बॉयफ्रेंड बंटी सजदेह आहे, जो अभिनेत्री सीमा सजदेहचा भाऊ आहे. सीमा सजदेह ही सोहेल खानची माजी पत्नी असून ती पूर्वी सीमा खान या नावाने ओळखली जात होती. सीमाला तुम्ही करण जोहरच्या लोकप्रिय नेटफ्लिक्स सीरिज 'फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज'मध्ये पाहिले आहे. रिया आणि बंटी बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि सध्या ते त्यांच्या नात्याबद्दल सार्वजनिकपणे येऊ इच्छित नाहीत.

Web Title: After Sushant Singh Rajput, Rhea Chakraborty fell in love again, dating the actress's brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.