Join us

'ऐश्वर्याकडे पाहून जळफळाट होतो'; KBC च्या मंचावर स्पर्धकाने व्यक्त केला राग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 13:09 IST

kaun banega crorepati:दिव्याने ऐश्वर्याचं कौतुक करताना हे उद्गार काढले आहेत. त्यामुळे बिग बींदेखील खूश झाले आणि त्यांनी दिव्यांचे आभार मानले.

ठळक मुद्देबॉलिवूडचं सौंदर्य अर्थात अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन हिच्या सौंदर्याची कायमच चर्चा होत असते.

बॉलिवूडचं सौंदर्य अर्थात अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन हिच्या सौंदर्याची कायमच चर्चा होत असते. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत ऐश्वर्याचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा तिच्या अभिनयाचं आणि सौंदर्याचं कौतुक होत असतं. परंतु, अलिकडेच केबीसीच्या(KBC) मंचावर आलेल्या एका महिला स्पर्धकाने ऐश्वर्याकडे पाहिल्यावर जळफळाट होत असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. विशेष म्हणजे या स्पर्धकाने थेट बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्यासमोर हे वक्तव्य केलं आहे. 

सध्या सोशल मीडियावर केबीसीचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिव्या सहाय या स्पर्धकाने तिच्या मनातील इर्षा व्यक्त केली आहे.

साखळदंडाने बांधून पाकिस्तानी अभिनेत्रीला मारहाण? नेमकं काय आहे प्रकरण

"तुमच्या सुनेकडे म्हणजेच ऐश्वर्याकडे पाहिल्यावर माझा प्रचंड जळफळाट होतो. १०० वर्षांनंतर इतकी सुंदर मुलगी जन्माला येते", हे पाहूनच मला प्रचंड जळायला होतं, असं दिव्या म्हणते. परंतु, दिव्याने ऐश्वर्याचं कौतुक करताना हे उद्गार काढले आहेत. त्यामुळे बिग बींदेखील खूश झाले आणि त्यांनी दिव्यांचे आभार मानले.

दरम्यान, 'कौन बनेगा करोडपती'चा हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजच्या (६ ऑक्टोबर) भागात दिव्या आणि बिग बी यांच्यात रंगलेल्या गप्पा व केबीसीचा खेळ पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअमिताभ बच्चनसेलिब्रिटी