Join us

कॅटने नाकारला सुशांतसिंगसोबतचा चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 10:42 IST

‘फँटम’ आणि ‘फितूर’ नंतर आता कॅटरिना कैफच्या  परफॉर्मन्सकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. सध्या ती ‘बार बार देखो’ चित्रपटामुळे ...

‘फँटम’ आणि ‘फितूर’ नंतर आता कॅटरिना कैफच्या  परफॉर्मन्सकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. सध्या ती ‘बार बार देखो’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तरून मनसुखानी यांनी जेव्हा सुशांतसिंग राजपूत याच्यासोबतचा चित्रपट तिला आॅफर केला.तेव्हा तिने तो नाकारला. तिला देण्यात आलेल्या रोलमुळे तिच्या अपेक्षा पूर्ण होत नव्हत्या. सध्या तिची करण जोहरसोबतची जवळीक जास्तच वाढली आहे. असे कळालेय की, आता कॅटला आॅफर करण्यात आलेला रोल जॅकलीन फर्नांडिस करणार आहे.मात्र, कॅटरिना आता करण जोहरच्या चित्रपटात काम करणार आहे. आणि तिच्या रोलमुळे ती खुप खुश आहे.