Join us

कतरीना कैफला खटकले जान्हवी कपूरचे तोकडे कपडे, सोनम कपूरचा चढला पारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 16:00 IST

सध्या ‘भारत’मुळे चर्चेत असलेली कतरीना कैफ तशी स्वत:त रमणारी अभिनेत्री. इतरांच्या गोष्टीत ती कधीच नाक खुपसत नाही. पण कदाचित कतरीनाचा स्वत:वरचा ताबा सुटला आणि ती बोलली. तिचे हे बोलणे एका व्यक्तिला चांगलेच खटकले. ती म्हणजे सोनम कपूर.

ठळक मुद्देकतरीना सध्या ‘भारत’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यात ती सलमान खानसोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. कुमूद नावाची व्यक्तिरेखा ती साकारते आहे.

सध्या ‘भारत’मुळे चर्चेत असलेली कतरीना कैफ तशी स्वत:त रमणारी अभिनेत्री. इतरांच्या गोष्टीत ती कधीच नाक खुपसत नाही. पण कदाचित कतरीनाचा स्वत:वरचा ताबा सुटला आणि ती बोलली. तिचे हे बोलणे एका व्यक्तिला चांगलेच खटकले. ती म्हणजे सोनम कपूर.होय, अलीकडे कतरीनाने नेहा धूपियाच्या  या चॅट शोमध्ये हजेरी लावली. या चॅट शोमध्ये कतरीनाला तिच्या खासगी आयुष्याबद्दल नेहाने अनेक प्रश्न विचारले. कतरीनानेही या प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिलीत. पण एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरामुळे मात्र तिने सोनम कपूरचा राग ओढवून घेतला.

होय, कोणत्या सेलिब्रिटीचा जिम लूक तुला ओव्हर द टॉप म्हणजे अतिरेकी वाटतो? असा प्रश्न नेहाने कतरीनाला केला. यावर कॅटने जान्हवी कपूरचे नाव घेतले. जान्हवीचे जिम लूक मला ओव्हर द टॉप तर वाटत नाही. पण हो, तिचे इतके छोटे शॉर्ट्स पाहून मला चिंता वाटते. जान्हवी माझ्याच जिममध्ये येते. अनेकदा आम्ही सोबत वर्कआऊट करतो. मला तिचे शॉर्ट्स पाहून चिंता वाटत राहते, असे कॅट   म्हणाली.

कतरीनाच्या या उत्तरावर जान्हवी तर काही बोलली नाही. पण जान्हवीची चुलत बहीण सोनम मात्र बिथरली. आपल्या इन्स्टा स्टोरीवर तिने याचे उत्तर दिले. ‘ती रेग्युलर कपडे घालते आणि शानदार दिसते,’ असे सोनमने डेनिम शॉर्ट्समधील जान्हवीचे फोटो शेअर करत लिहिले. यात सोनमने कुठेही कतरीनाचे नाव घेतले नाही. पण सोनमचे हे उत्तर कतरीनासाठीच होते, हे कळायला लोकांना वेळ लागला नाही.कतरीना सध्या ‘भारत’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यात ती सलमान खानसोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. कुमूद नावाची व्यक्तिरेखा ती साकारते आहे.

टॅग्स :कतरिना कैफसोनम कपूरजान्हवी कपूर