Join us  

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: अशी लाजली नववधू...! लग्नाआधी सासरी पोहोचली कतरिना कैफ, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 10:24 AM

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: लग्नाआधी विकीच्या घरी डिनर पार्टी; कतरिनाच्या चेह-यावरचा वेगळाच ग्लो...

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) व अभिनेत्री कतरिना कैफ  (Katrina Kaif)  यांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. हे लग्न खरंच होतंय, का असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. अखेर लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. रविवारी कतरिना तिच्या कुटुंबीयांसोबत विकीच्या घरी पोहोचली आणि लग्न होणार, हे नक्की झालं. होय, लग्नाआधी कतरिनाच्या कुटुंबीयांसाठी विकीच्या घरी खास डिनर पार्टी ठेवण्यात आली होती. यावेळी कतरिनाची आई, बहिण इसाबेल आणि भाऊ सबास्टियन शिवाय कतरिना असे सगळे विकीच्या घरी पोहोचले.

विकीच्या घरी जात असताना कतरिनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या खास डिनर पार्टीसाठी कतरिनाने व्हाईट रंगाची साडी रफल साडी नेसली होती. यावेळी कतरिनाने मीडियाशी बोलणं टाळलं. पण होणारी नववधू लाजतांना मात्र दिसली. तिच्या चेह-यावरचा ग्लो वेगळाच होता. 

काल कतरिना एका क्लिनिकबाहेर स्पॉट झाली होती. तिचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये ती चाहत्यासोबत सेल्फी घेताना दिसली होती. चाहत्यांच्या विनंतीवरून कतरिनाने चाहत्यासोबत सेल्फी काढला होता. तिचा हा नम्र स्वभाव पाहून एका यूजरने तर तिच्या कौतुकात ‘सुंदर मनाची वधू’असं लिहिलं होतं.विकी व कतरिना 2019 पासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये एका मित्राच्या दिवाळी पार्टीत विकी आणि कतरिना पहिल्यांदा एकत्र झळकले होते. तेव्हापासून या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं.  

येत्या 9 डिसेंबरला कॅट व विकी लग्नबंधनात अडकणार आहेत. आज सोमवारी वरवधू दोघेही राजस्थानसाठी रवाना होत आहेत. 7 व 8 डिसेंबरपासून लग्नाच्या विधींना सुरूवात होणार आहे.राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा, सवाई माधोपूर याठिकाणी बॉलिवूडमधील हे सर्वात मोठं लग्न होणार असल्याचं कळतंय. लग्नावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे.  

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल