Join us  

लग्नाच्या ५ महिन्यांतच कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या घरी हलणार पाळणा?, अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबाबत मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 4:08 PM

लग्न होऊन पाच महिने होत नाहीत तोच, कतरिनाकडे गुडन्यूज असल्याची चर्चा सुरु झालीय. जाणून घ्या यामागचं सत्य.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif ) व अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकले. पण लग्न होऊन उणेपुरे पाच महिने होत नाहीत तोच, कतरिनाकडे गुडन्यूज असल्याची चर्चा सुरु झाली होती.

काही दिवसांपूर्वी कतरिनाचा एअरपोर्टवरचा एक व्हि़डीओ व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत कतरिना गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये दिसली होती. कतरिना आपलं पोट लपवण्याचा प्रयत्न करतेय, त्यावरून ती प्रेग्नंट असल्याच्या अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होता होता. आणि त्यानंतर  कतरिना प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.  मात्र, आता या बातमीचे सत्य समोर आले आहे. कतरिनाच्या टीमच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफच्या टीमने हे सर्व दावे खोटे ठरवले आहेत. यासोबतच कतरिना प्रेग्नंट नसल्याचे आणि मीडियामध्ये येत असलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलंय.

दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्यावर्षी 9 डिसेंबरला विकी व कतरिना लग्नबेडीत अडकले होते. राजस्थानात हा शाही विवाह सोहळा पार पडला होता. या लग्नात केवळ कुटुंबीय व जवळचे मित्रमंडळी सामील झाले होते.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर कतरिना सध्या सलमानसोबत ‘टायगर 3’ या चित्रपटात बिझी आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबत तामिळ व तेलगूत रिलीज होणार आहे. याशिवाय फोन भूत, जी ले जरा, मेरी ख्रिसमस या चित्रपटातही ती झळकणार आहे.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल