Join us

​कॅटरिना कैफवर अशी काही खिळली सलमान खानची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 15:06 IST

अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट तसा  डिसेंबरमध्ये रिलीज होतोय. पण सोशल मीडियावर या चित्रपटाची हलकी-फुलकी ...

अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट तसा  डिसेंबरमध्ये रिलीज होतोय. पण सोशल मीडियावर या चित्रपटाची हलकी-फुलकी झलक आपण पाहिली आहेच. ‘टायगर जिंदा है’चे शूटींग सुरु झाले अगदी तेव्हापासून या ना त्या पद्धतीने या चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. अलीने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कुठलीही कसर सोडलेली नाही, हेच यावरून दिसतेय. काल अलीने या चित्रपटाच्या सेटवरचा असाच आणखी एक फोटो शेअर केलाय. कॅटरिना कैफ मावळत्या सूर्याच्या साक्षीने निरभ्र आकाशाचा फोटो काढतेय आणि सलमान एकटक कॅटला न्याहाळतोय, असा हा फोटो आहे. ‘जोया सुर्यास्त कॅमेºयात टिपतेय आणि टायगर तिला बघतोय,’ असे कॅप्शन अलीने या फोटोला दिले आहे.  पण खरे सांगायचे तर या फोटोला कॅप्शनची गरजच नव्हती. कारण हा फोटो स्वत:तच एक कथा आहे. ती सुद्धा हळूहळू फुलत असलेली एक रोमॅन्टिक प्रेमकथा. होय,सलमान खान आणि कॅटरिना कैफ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. सलमान व कॅटची ‘अबोल’ प्रेमकथाच जणू हा फोटो सांगतोय.ALSO READ : ​सलमान खान व कॅटरिना कैफचा इंटिमेट फोटो होतोय वेगाने व्हायरल ! बघितला नसेल तर इथे बघा!!कधीकाळी कॅट व सलमान रिलेशनशिपमध्ये होते. पुढे त्यांचे ब्रेकअप झाले. कॅट सलमानला सोडून रणबीर कपूरच्या प्रेमात पडली. पण सलमान मात्र जिथे होता तिथेच थांबला. कदाचित आपली ‘जोया’ परत येईल, अशी आस त्याला असावी. आता कॅट व रणबीरच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत. आता कॅटची वाट पुन्हा सलमानपर्यंत येऊन थांबते की सलमानला मागे टाकून पुन्हा समोर जाते, हे आपण बघूच. तोपर्यंत कॅट व सलमानचा हा फोटो तुम्ही बघायलाच हवा.