By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 15:11 IST
आलिया भट हिचा ‘कलंक’ हा आगामी चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. कालच या चित्रपटाचे पहिले गाणे ‘घर मोरे परदेसिया’ रिलीज झाले आणि प्रत्येक जण नव्याने आलियाच्या प्रेमात पडला. कॅटरिना कैफ हिलाही हे गाणे पाहून आलियाचे कौतुक करण्याचा मोह आवरता आला नाही.
ठळक मुद्देआलिया व रणबीर कपूरचे रिलेशन जगजाहिर झाल्यापासून आलिया व कॅटच्या मैत्रीच्या बातम्याही चर्चेत आहेत. रणबीर आलियाआधी कॅटरिनाला डेट करत होता. यानंतर अचानक कॅटला सोडून रणबीर आलियात गुंतला.
आलिया भट हिचा ‘कलंक’ हा आगामी चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. कालच या चित्रपटाचे पहिले गाणे ‘घर मोरे परदेसिया’ रिलीज झाले आणि प्रत्येक जण नव्याने आलियाच्या प्रेमात पडला. या गाण्यातील तिच्या कथ्थक नृत्याने तर सगळ्यांना ‘खल्लास’ केले. गाण्यातील तिची अन् माधुरी दीक्षितची जुगलबंदीही चाहत्यांना भावली. साहजिकच प्रत्येक जण आलियाचे कौतुक करत सुटला. कॅटरिना कैफ हिलाही हे गाणे पाहून आलियाचे कौतुक करण्याचा मोह आवरता आला नाही. ‘Well Done Alu..’, असे लिहित तिने आलियाचे कौतुक केले.
कॅटचे हे कौतुकाचे शब्द वाचून आलियाही भारावली. तिनेही कॅटला सुंदर उत्तर दिले. ‘तुझे हे कौतुकाचे बोल माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे, याचा तुला अंदाज नाही,’ असे लिहित तिने कॅटचे आभार मानले. लव्ह यू कॅटी...हे लिहायलाही ती विसरली नाही.
आलिया व रणबीर कपूरचे रिलेशन जगजाहिर झाल्यापासून आलिया व कॅटच्या मैत्रीच्या बातम्याही चर्चेत आहेत. रणबीर आलियाआधी कॅटरिनाला डेट करत होता. यानंतर अचानक कॅटला सोडून रणबीर आलियात गुंतला. अर्थात यामुळे आलिया व कॅटच्या मैत्रीत कुठलाही खंड पडला नाही. आता तर ही मैत्री अधिक घट्ट झाल्याचे दिसतेय. आलियाच्या ‘कलंक’ या चित्रपटाबद्दल सांगायचे तर या चित्रपटाचा टीजर तुम्ही पाहिला आहेच. येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येऊ घातलेल्या या चित्रपटात आलिया भट्ट, वरूण धवण, माधुरी दीक्षित, संजय दत्त, आदित्य राय कपूर, सोनाक्षी सिन्हा अशी दमदार स्टारकास्ट आहे.