Join us

कॅटरिना कैफने म्हटले, रणबीर कपूर आणि माझ्यात नेहमीच वाद व्हायचे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 14:30 IST

सध्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एकेकाळचे लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ एकत्र आले आहेत. बºयाच ठिकाणी ...

सध्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एकेकाळचे लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ एकत्र आले आहेत. बºयाच ठिकाणी ते हसतमुखाने माध्यमांना व त्यांच्या चाहत्यांना सामोरे जात आहेत. परंतु त्यांच्या चेहºयावर हे हास्य क्षणिक असून, दोघांना एकमेकांची कंपनी अजिबातच आवडत नसावी असेच काहीसे चित्र आहे. विशेष म्हणजे ही बाब कॅटरिनाने मान्य केल्याने या दोघांमध्ये अजूनही आलबेल नसावे असेच म्हणावे लागेल. रणबीर आणि कॅटच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या सगळ्यांचे लक्ष आकर्षित करीत असून, त्यामध्ये दोघेही एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. कॅटने तर कॅमेºयासमोरच रणबीर आणि माझ्यात नेहमीच ‘तू-तू-मैं मंै’ होत असल्याचे सांगितल्याने यांच्यातील वादाची तीव्रता लक्षात येते. कॅटरिनाने म्हटले की, आमच्यातील नाते पूर्वीपासूनच असेच होते. आम्ही नेहमीच एकमेकांचा पाय ओढण्याचा प्रयत्न करीत होतो. रणबीर आणि माझ्या पर्सनल इक्वेशनविषयी आम्ही दोघांनाही माहिती आहे. आमच्यातील ही तणाव स्थिती आतापासून नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. वास्तविक आम्ही ही स्थिती एन्जॉय करीत होतो. काही दिवसांपूर्वी असे म्हटले होते की, आता रणबीरसोबत मी कधीच चित्रपट करणार नाही. हे माझे वक्तव्य केवळ चेष्टा मस्करीत होते. परंतु माध्यमांनी त्याला चुकीचे पद्धतीने लोकांसमोर मांडले. रणबीर आणि कॅटरिना एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांच्या प्रेमाच्या चर्चा एवढ्या रंगल्या होत्या की, दोघी लवकरच विवाहबंधनात अडकतील असे बोलले जात होते. मात्र दीड वर्षात त्यांचे ब्रेकअप झाले. याचा फटका त्यांच्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाला बसला. दोघांमधील वाद एवढा उफाळून आला होता की, त्यांची समजूत काढताना निर्मात्यांच्या नाकीनव आले होते. दोघे प्रमोशनला तरी एकत्र येतील काय? याचीही शंकाच होती. मात्र दोघांमधील रुसवा काहीसा दूर करून निर्मात्यांनी त्यांना एकत्र आणले. तेही ‘झाले गेले गंगेला मिळाले’ याप्रमाणे एकत्र येत एकमेकांशी प्रोफेशनल पद्धतीने वागत आहेत. परंतु अशातही त्यांच्यात कधी-कधी खटके उडू लागल्याने हे कपल पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. सध्या कॅट प्रचंड बिझी आहे. कारण ‘जग्गा जासूस’च्या प्रमोशनबरोबर ती एक्स बॉयफ्रेंड सलमान खान याच्यासोबत ‘टायगर जिंदा हैं’मध्येही काम करीत आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याने तिची चांगलीच कसरत होत आहे. त्याचबरोबर कॅटरिनाला शाहरूख खानचाही चित्रपट मिळाला आहे. तसेच ती आमिर खान याच्या ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’मध्ये काम करीत आहे. सध्या कॅट तिन्ही सुपरस्टार्ससोबत काम करीत असल्याने आगामी काळात ती बॉलिवूडवर वर्चस्व गाजविताना दिसेल यात शंका नाही.