Join us  

katrina and vicky: विक्की कौशलसाठी कतरिना कैफने केले 'हे' काम, पाहून चाहत्यांनी दिल्या विविध प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 9:33 PM

katrina and vicky: विक्की आणि कतरिना नुकतेच परदेशातून परतले असून, त्यांच्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ (katrina kaif) तिचा पती अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. ते दोघेही नेहमी त्यांच्या आयुष्यातल्या आनंददायी क्षणांचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंना चाहतेही चांगला प्रतिसाद देतात. आता परत एकदा कतरिना कैफने शेअर केलेला एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

कतरिनाने विकीसाठी बनवला नाश्ता विकीला खूश करण्यासाठी कतरिना कैफने स्वतःच्या हाताने स्वादिष्ट नाश्ता बनवला आणि विकीला खायला दिला. कतरिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एका चविष्ट पदार्थाचा फोटो शेअर केला आहे, ज्यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "माझ्या नवऱ्यासाठी रविवारचा नाश्ता." तिच्या या स्टोरीवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

डिसेंबरमध्ये झाले लग्न कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकले. दोघांच्या वयात पाच वर्षांचा फरक असला तरी या जोडप्याची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. नुकतेच हे जोडपे परदेशातून परतले आहे. या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

विकी-कतरिनाचे आगामी चित्रपटवर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिना कैफ तिच्या नवीन चित्रपट 'टायगर 3' मुळे चर्चेत आहे. त्याचवेळी विकीने काही दिवसांपूर्वीच सारा अली खानसोबत एका नवीन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल