दरम्यान, कॅटने म्हटले की, ‘हे अविश्वसनीय आहे. आम्ही जेव्हा ‘टायगर जिंदा हैं’वर काम सुरू केले तेव्हा आम्हाला विश्वास वाटत होता की, आमच्याकडे एक चांगली पटकथा आहे. अलीने या पटकथेला सर्वोत्तम बनविण्याचा खूप चांगला प्रयत्न केला. आम्ही ज्या पद्धतीने हा चित्रपट पडद्यावर साकारला आहे, त्यावरून प्रेक्षक समाधानी आहेत. चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करीत आहे.
पुढे बोलताना कॅटरिनाने म्हटले की, ‘एक अभिनेत्री म्हणून मी नेहमीच अशा चित्रपटाचा भाग बनू इच्छिते. ज्या पद्धतीच्या प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया मिळत आहेत, त्यावरून मी समाधानी आहे. तसेच प्रेक्षकांचे आम्ही मनोरंजन करण्यात यशस्वी झाल्याचा आनंदही होत आहे. दरम्यान, ‘टायगर जिंदा हैं’ २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. ‘एक था टायगर’ या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स आॅफिसवर १७३ कोटी रूपयांची कमाई केली होती. तीनच दिवसांत ४५.५३ कोटी रूपयांचा गल्ला जमवित या चित्रपटाने एक नवा रेकॉर्ड केला होता. आता ‘टायगर जिंदा हैं’ हा चित्रपटदेखील असाच काहीसा रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे.