Join us
Daily Top 2Weekly Top 5

कतरिना, सिद्धार्थ आणि इशान 'फोन भूत'मध्ये दिसणार एकत्र, जाणून घ्या कधी सुरु होणार शूटिंग

By गीतांजली | Updated: November 2, 2020 17:55 IST

फोन भूत'मध्ये कतरिना कैफ, इशान खट्टर आणि सिद्धार्थ चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

'फोन भूत'चे मेकर्स याच महिन्याच्या शेवटी गोव्यात कॉमेडी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. 'फोन भूत'मध्ये कतरिना कैफ, इशान खट्टर आणि सिद्धार्थ चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार  सिद्धार्थ आधीपासूनच गोव्यात आहे. जिथं तो शकुन बत्राच्या आगामी सिनेमाची शूटिंग करतो आहे. कतरिना आणि इशाना नोव्हेंबरमध्ये गोव्यासाठी रवाना होणार आहेत. रिपोर्टनुसार सिनेमाचे शूटिंग सुरु करण्याआधी कतरिना आपल्या कुटुंबियांना भेटायला लंडनला गेली आहे. गोव्यानंतर शूटिंग मुंबईत होणार आहे.  'फोन भूत' चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक गुरमीत सिंगने सांगितले की,प्रोजेक्ट सुरू केल्याने मी रोमांचित आहोत.

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर कतरिना रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. अली अब्बास जफरच्या सुपरहीरो सीरिजमध्ये देखील ती झळकणार आहे.  हा एक बिग बजेट सिनेमा आहे जो नेटफ्लिक्ससाठी तयार करण्यात येतो आहे. यात कतरिना सुपरहिरोची भूमिका साकारणार आहे. 1987 मध्ये आलेला अनिल कपूर आणि श्रीदेवीचा सुपरहिट फिल्म 'मिस्टर इंडिया' वर आधारित असेल. सिनेमाचे बजेट खूप जास्त आहे आणि शूटिंग चार देशांमध्ये होणार आहे.जागरणच्या रिपोर्टनुसार अली अब्बास अलीकडेच म्हणाला की, सुपरहिरो सिनेमामधील काही सीन्ससाठी त्याने दुबई लॉकशन लॉक केले आहे. अलीने अबु धाबी आणि दुबईमधले काही लोकेशन्स बुक केले आहेत, जिथे सिनेमाची शूटिंग होणार आहे. 

टॅग्स :कतरिना कैफ